Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Twitter News : ट्वीटरनं २५ लाखांहून अधिक खात्यांना केलं बॅन, पाहा नेमकं कारण काय?

14

नवी दिल्ली : Twitter Account ban : मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्वीटरबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीच्या निश्चित केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ट्वीटरनं भारतात तब्बल २५ लाखांहून अधिक खाती बंद केली आहेत. तसंच कंपनीने २,२४९ खाती ही पूर्णपणे बंद केली आहेत. देशातील दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप असल्याने ही खाती बंद करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ट्वीटरने भारतात एकूण २५,५३,८८१ अकाउंट्स बॅन केले आहेत.
ट्वीटरने नवीन IT नियम, 2021 च्या पालनाबाबत आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, त्यांना तक्रार निवारण यंत्रणेद्वारे भारतीय वापरकर्त्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कंपनीने सांगितले की, “या तक्रारींबाबत, कंपनीने रिव्ह्यूव केले आणि तीन खात्यांवर बंदी घातली. उर्वरित अहवाल खाती निलंबित करण्यात आली आहेत.” कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी प्रत्येक तक्रारीकडे लक्ष दिले आणि नंतर सर्व बाबींचा विचार करून खात्यांवर कारवाई केली.
वाचा : iPhone 13 वर भन्नाट ऑफर, थेट ३८,००० वाचवण्याची संधी, पाहा नेमकी ऑफर काय?काय होत्या युजर्सच्या तक्रारी?
Twitter नुसार, भारतीय वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारी मुख्यतः गैरवर्तन/छळ (83), संवेदनशील प्रौढ सामग्री (41), द्वेषपूर्ण आचरण (19) आणि बदनामी (12) संबंधित होत्या. एका अहवालानुसार, ट्वrटरने भारतासह जागतिक स्तरावर सामग्रीवर बंदी घालण्याच्या किंवा ब्लॉक करण्याच्या ८३ टक्के सरकारी विनंत्या मंजूर केल्या आहेत.

वाचा : Instagram Security : इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्ती देत आहे त्रास? ही सेटिंग करा आणि लगेचच मिळवा सुटका

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.