Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘गेल्यावर्षी आणि या वर्षीही दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाचा कहर अनुभवला, आता काही प्रमाणात औषधं उपलब्ध झाली असली तरी पण ऑक्सिजन क्षमता अजूनही कमी आहे. ऑक्सिजनचे प्रमाण लक्षात घेऊन आपण निर्बंधात शिथिलता आणत आहोत. करोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. परदेशात काही ठिकाणी ते नव्याने उसळलेले आहे. आपल्याकडे हे संकट नव्याने उसळू नये म्हणून काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे, असं आवाहन करतानाच ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो,’ असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
वाचाः मुंबईकरांनी करुन दाखवलं! आदित्य ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
‘करोनाशी लढताना एका गोष्टीचं समाधान आहे की लसीकरणानं वेग घेतला आहे. कालच राज्यानं साडेनऊ लाख लोकांना लसीकरण करून एक वेगळा उच्चांक प्रस्थापित केला आहे. आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतो आहोत. आज सगळ्यांनी निश्चय केला पाहिजे, की मी माझा देश करोनामुक्त करणारच आणि पुढचा स्वातंत्र्यदिन मुक्त वातावरणात उत्साहात साजरा करणारच ही प्रतिज्ञा आपण करुयात,’ असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
वाचाः …तर ईडी, सीबीआयची चौकशी लावू; मिलिंद नार्वेकरांना धमकी
‘करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक करोना योद्ध्यांनी दिवसरात्र संघर्ष केला. अनेकांना करोनाची बाधा झाली यात काहीजण बरे झाले काही जण दुर्देवाने शहीद झाले त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो,’ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.