Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Latest laptop : 1TB चं तगडं स्टोरेज, i7 सारखा लेटेस्ट प्रोसेसर, किंमतही बजेटमध्ये

6

नवी दिल्ली :Infinix ने आपल्या लॅपटॉप सेगमेंटमध्ये आणखी एक लॅपटॉप आणला आहे. कंपनीने नवीन InBook X2 सीरीजच्या नोटबुक लॅपटॉपला लाँच केलं आहे. 11th-Gen Core i7 प्रोसेसर नवीन लॅपटॉप मालिकेत दिसत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, Infinix ने टॉप-व्हेरियंट InBook X2 Slim मध्ये 16GB RAM आणि 1TB स्टोरेज दिले आहे. विशेष म्हणजे या लॅपटॉपची किंमत फक्त ५१,००० रुपये ठेवण्यात आली आहे. हा लॅपटॉप मेटल बॉडीसह येतो जी महागड्या लॅपटॉपमध्येही दिसत नाही.

या लाइनअपमधील सर्वात परवडणारा लॅपटॉप हा Infinix InBook X2 Slim i3 Edition आहे जो 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह येतो. त्याची किंमत २७,९९० रुपये आहे. Infinix InBook X2 Slim ची विक्री Flipkart वर ९ जूनपासून सुरू होईल. कदाचित त्यासोबत काही बँक ऑफर्सही मिळतील. नवीन नोटबुक लाल, हिरवा, सिल्व्हर आणि निळ्या रंगात उपलब्ध आहेत.

Infinix InBook X2 चे फीचर्स

हा लॅपटॉप ३ व्हेरियंटमध्ये येतो. 11th-Gen Intel Core i3, i5, आणि i7 प्रोसेसर असे तीन प्रकार असून लॅपटॉप एकात्मिक GPU सह येतात. त्यामुळे हेवी गेमिंग या लॅपटॉपवर भारीप्रकारे होऊ शकते. लॅपटॉप PCle 3.0 SSD फास्ट-स्टोरेजसह येत असून LPPDR4X RAM सह येतात. कंपनीने सांगितले आहे की त्यांनी यात 1.0 कूलिंग सिस्टम दिली आहे. यात 2 USB 3.0 Type-A पोर्ट, HDMI पोर्ट आणि Type-C पोर्ट आहेत. InBook X2 स्लिम सिरीजला फुल-एचडी रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह IPS डिस्प्ले मिळतो.

InBook X2 स्लिम लॅपटॉपमध्ये 50Wh बॅटरी उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की हा लॅपटॉप 11 तास वेब ब्राउझिंग आणि 9 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देईल. एक 65W अडॅप्टर पॅकेजमध्ये येतो आणि वापरकर्ते ते टाइप-सी पोर्टद्वारे देखील चार्ज करू शकतात. सर्व नवीन लॅपटॉप Windows 11 OS वर काम करतात.

वाचा : Instagram Security : इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्ती देत आहे त्रास? ही सेटिंग करा आणि लगेचच मिळवा सुटका

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.