Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
BSNL चा सर्वात स्वस्त प्लान
ही कंपनीची सर्वात किफायतशीर योजना आहे. यामध्ये यूजर्सला दर महिन्याला ३२९ रुपये द्यावे लागतील. यामध्ये 1TB (1000GB) मासिक डेटा दिला जात आहे. यासोबतच यूजर्सना 20 Mbps चा इंटरनेट स्पीड देखील दिलं जाईल. तुमचा मासिक डेटा संपल्यावर, इंटरनेटचा वेग कमी होऊन ४ एमबीपीएस होतो. या प्लानमध्ये यूजर्सना आणखी एक फ्री फायदा मिळत आहे. यामध्ये फिक्स्ड लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला फिक्स्ड लाइनसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. यामध्ये यूजर्सना प्रत्येक नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
एअरटेल-जिओच्या प्लान्सना तगडी टक्कर
एअरटेलच्या सर्वात किफायतशीर प्लानबद्दल बोलायचं झालं तर, कंपनी यूजर्सला ४९९ रुपयांचा प्लान ऑफर करत आहे. यामध्ये ४० एमबीपीएस इंटरनेट स्पीडसह अमर्यादित डेटा दिला जात आहे. हा डेटा ३३००जीबी पर्यंत उपलब्ध असेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. जिओच्या प्लानबद्दल बोलायचं झालं तर त्याचा प्लान ३९९ रुपयांचा आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. यासोबतच 30 Mbps चा इंटरनेट स्पीड दिला जात आहे. दरम्यान किंमतीच्या बाबतीत तरी बीएसएनएलचा प्लान अगदी स्वस्त आहे.
वाचा : स्वस्तात iPhone घेण्याची संधी, ३२ हजारपेक्षाही कमी किंमत, Amazon वर सुरु आहे ऑफर