Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
यंदा दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातून मुंबई महानगरातील कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी यंदा चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. राज्य मंडळाच्या परीक्षेत दहावीत उत्तीर्ण झालेल्या ११ हजार ७८५ विद्यार्थ्यांना यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेतही ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यंदा चांगलीच चुरस अनुभवायला मिळणार आहे.
राज्य मंडळाच्या परीक्षेत मुंबई विभागात गेल्या वर्षी १० हजार ७६४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले होते. त्यामध्ये यंदा १ हजार २१ विद्यार्थ्यांची भर पडली आहे. त्यातून नामांकित कॉलेजमधील मर्यादीत जागांवरील प्रवेशासाठी यंदा स्पर्धा वाढेल, असे मत महाविद्यालयांचे प्राचार्य व्यक्त करत आहेत. मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेला प्रवेश घेऊन सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांकडे अधिक ओढा असतो. त्यातून कॉमर्स अभ्यासक्रमांनाही चढाओढ असते.
—
गेल्या वर्षीची पहिली कट ऑफ यादी
वाणिज्य शाखा
मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स – ४५४
पोदार कॉलेज – ४६२
डहाणूकर कॉलेज – ४४७
एच. आर. कॉलेज – ४६५
नरसी मोनजी (एन. एम.) कॉलेज – ४६८
रामानंद आर्य डी. ए. व्ही कॉलेज भांडुप – ३९९
वझे केळकर कॉलेज – ४५६
जोशी बेडेकर कॉलेज – ४४२
साठ्ये कॉलेज – ४३६
—
विज्ञान शाखा
बी. एन. बांदोडकर कॉलेज – ४५४
रामानंद आर्य डी. ए. व्ही. कॉलेज, भांडुप – ४२३
रुईया कॉलेज – ४६२
वझे केळकर कॉलेज – ४५९
पाटकर कॉलेज – ४४५
कीर्ती कॉलेज – ४१०
एम. डी. कॉलेज – ३९१
साठ्ये कॉलेज – ४३९
सेंट झेवियर्स कॉलेज – ४४८
—
कला शाखा
रुईया कॉलेज – ४५७
वझे केळकर कॉलेज – ४२९
पाटकर कॉलेज – ३७२
जोशी बेडेकर कॉलेज – ३९४
कीर्ती कॉलेज – ३५९
साठ्ये कॉलेज – ३८९
सेंट झेवियर्स कॉलेज – ४७१
—
अकरावी प्रवेशासाठी जागा
मुंबई महानगरातील कॉलेजांची संख्या – १,०२०
कला शाखा – ४९,३९०
वाणिज्य शाखा – २,०२,३२०
विज्ञान शाखा – १,२१,५२०