Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Samsung Galaxy F54 5G ची ९९९ रुपयात बुकिंग, थेट २ हजाराची सूट

7

सॅमसंगचा अपकमिंग स्मार्टफोन Galaxy F54 5G ची प्री बुकिंग सुरू करण्यात आली आहे. या फोनला ६ जून रोजी लाँच करण्यात येणार आहे. परंतु, ग्राहक आज पासून Galaxy F54 5G ला प्री बुक करू शकतील. यासाठी ग्राहकांना फक्त ९९९ रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही गॅलेक्सी एफ ५४ ची प्री बुकिंग करीत असाल तर तुम्हाला थेट २ हजार रुपयाचा डिस्काउंट मिळेल. सॅमसंगच्या या फोनला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. फोनची लाँचिंग झाली नाही. त्यामुळे फोनच्या किंमतीचा अद्याप खुलासा करण्यात आला नाही. परंतु, हा फोन २५ ते ३० हजार रुपये किंमतीत लाँच केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. फोनला ग्रीन आणि ब्लू कलर मध्ये आणले जाऊ शकते. याचा मेन कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सपोर्ट सोबत येईल.

वाचाः फक्त २४० रुपयात Airtel चा १.५ जीबी डेटा प्लान, ८४ दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग

Samsung Galaxy F54 5G चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये ६.७ इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो 2400×1080 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत येईल. फोन 120Hz फुल-एचडी+ डिस्प्ले सपोर्ट सोबत येईल. फोनला ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सपोर्ट दिले जाऊ शकते. सोबत फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. सॅमसंगच्या या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. या फोनमध्ये 25W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Samsung Galaxy M14 5G के ये फीचर्स बदल देंगे फोन चलाने का तरीका

नोटः Samsung Galaxy F54 5G स्मार्टफोन सोबत एडॉप्टर आणि कव्हर दिला जाणार नाही, अशी सूचना दिली जात आहे. याचाच अर्थ यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील.

वाचाः ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या हे Rechargeable Bulb, ‘या’ साईटवर मिळतेय खास डिल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.