Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘हे’ ८ Cryptocurrency Mining ॲप्स तुमच्या मोबाईलसाठी धोक्याचे, आताच करा डिलीट, नाहीतर होईल मोठं नुकसान

8

नवी दिल्ली :Fake Cryptocurrency Apps : आजकाल अनेकजण बिटकॉइन, इथरियम सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहेत. याशिवाय क्रिप्टोकरन्सी मायनिंग ॲप्समधून देखील लोक पैसे कमवत आहेत. पण याचस ॲप्सचा चूकीचा फायदा काही ॲप्स घेत आहेत. एका सिक्युरिटी रिसर्च फर्मने नुकतेच शोधून काढले आहे की, अँड्रॉइडमधील गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक ॲप्स आहेत, जे वापरकर्त्यांची फसवणूक करण्याचे काम करत आहेत. गुगलने यापैकी ८ ॲप्सही जाहीर केले आहेत. हे सर्व ॲप्स डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी पैसे आकारतात किंवा ते इन्स्टॉल करण्यासाठी फ्रीमध्ये देखील उपलब्ध असतात. पण फोनमध्ये हे ॲप्स रन होताना ते वापरकर्त्यांचा डेटाही चोरतात.ट्रेंड मायक्रो सिक्युरिटी फर्मने चेतावणी दिली आहे की गुगल प्ले स्टोअरवरील शेकडो क्रिप्टो मायनिंग ॲप्सवापरकर्त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर हे ॲप्सचुकीच्या पद्धतीने जाहिराती दाखवत असू यूजर्सच्या वैयक्तिक डेटामध्येही घुसखोरी करतात. अहवालात म्हटले आहे की Google ने क्रिप्टोकरन्सी मायनिंगशी संबंधित ८ ॲप्स आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत, परंतु तरीही वापरकर्त्यांनी Google Play Store वर ‘क्लाउड मायनिंग’ शोधल्यास, त्यांना असेच अनेक हानिकारक ॲप्स मिळू शकतात.

ट्रेंड मायक्रोने माहिती दिली आहे की Google ने काढलेले ८ ॲप्स जाहिराती आणि सब्सक्रिप्शन सेवेद्वारे वापरकर्त्यांकडून दर महिन्याला सरासरी $ 15 (सुमारे १,१०० रुपये) मिळवत होते. मायनिंगमधून सामान्य वापरकर्त्यांपेक्षा अधिक पैसे कमावण्याचे आश्वासन देऊन हे ॲप्स वापरकर्त्यांना अतिरिक्त पैसे देतात आणि पण या फेक ॲप्समधून युजर्सना काहीही मिळाले नाही. तर हे ८ ॲप्स कोणते ते जाणून घेऊ…

बॅन करण्यात आले आहेत ‘हे’ 8 क्रिप्टोकरन्सी मायनिंग ॲप्स
BitFunds – Crypto Cloud Mining
Bitcoin Miner – Cloud Mining
Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet
Crypto Holic – Bitcoin Cloud Mining
Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System
Bitcoin 2021
MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner
Ethereum (ETH) – Pool Mining Cloud

वाचा : Smart Pant : ऐकावं ते नवलंच! ‘या’ ॲपमुळे आता पँटची चैन बंद करायला विसरल्यावर मिळणार नोटिफिकेशन

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.