Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

WWDC 2023 : ॲपलनं लाँच केला iPadOS 17 अपडेट, आता आयपॅडमध्ये येणार आणखी दमदार फीचर्स

10

नवी दिल्ली :Apple WWDC 2023 या ॲपलच्या वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फ्रेन्सला ५ जूनपासून सुरुवात झाली आहे. या इव्हेंटमध्ये लेटेस्ट iOS 17 Update आयफोनसाठी कंपनी घेऊन येणार आहे. त्यासोबतच कंपनीने आता आयपॅडसाठी iPadOS 17 अपडेट लाँच केला असून यामुळे आता आयपॅडमध्ये हेल्थ, क्रिएटिव्हिटी आणि मल्टीटास्किंग संबधित साऱ्या गोष्टी आणखी भारी पद्धतीनं करता येणार आहेत.तर ज्या डिव्हाईसेससाठी हा iPadOS 17 असणार आहे त्यांना या वर्षाच्या अखेरपर्यंत हा अपडेट डाऊनलोड करता येणार आहे. चलातर जाणून घेऊ या iPadOS 17 चे खास फीचर्स

वाचा : WWDC 2023 : ॲपलनं आणला जगातील सर्वात स्लिम Macbook Air, पाहा १५ इंच मॅकबुकची किंमत आणि फीचर्स

iPadOS 17 चे खास फीचर्स

आयपॅड ओएसमुळे आता आयपॅडमध्ये प्रथमच लॉक स्क्रीन सपोर्ट मिळेल. आयफोन युजर्सना iOS 16 मध्ये लॉक स्क्रीन जसं कस्टमाईज्ड करता येतं तसंच आता आयपॅड युजर्सनाही करता येईल. त्यामुळे आयपॅड लॉक असताना त्याची स्क्रिन हवी तशी कस्टमाईज्ड करता येईल. याशिवाय या iPadOS 17 मुळे आयपॅडमध्ये हेल्थ रिलेटेड बरेच लेटेस्ट फीचर्स येणार आहेत. स्टेप मॅनेजर, फाईंड माय डिव्हाईस यामध्येही अधिक सुधार होणार आहे. तसंच एक जर्नल अॅप आयपॅडमध्येही येईल. हे अॅप iOS 17 अपडेटनंतर आयफोनमध्येही येणार आहे.

कंपनीनं आणला सर्वात स्लिम मॅकबुक
याच वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फ्रेन्समध्ये 15 inch Macbook Air लाँच केला आहे. विशेष म्हणजे हा मॅकबुक फक्त ११.५ मिमी एवढाच जाड असल्याने हा एक सर्वात स्लिम असा १५ इंचाचा मॅकबुक आहे. याचे फीचर्सही अगदी भारी आहेत. ज्यात कंपनीने 8 Core सीपीयू आणि 10 Core जीपीयू दिला आहे. हा इंटेल पावर्ड मॅकबुकच्या तुलनेत १२ पटीने अधिक वेगवान आहे.

वाचा : WWDC 2023: फक्त ‘या’ आयफोन मॉडेल्सनाच मिळणार iOS 17 अपडेट, पाहा संपूर्ण यादी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.