Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भविष्यात स्मार्ट टीव्हीचं काय होणार? आनंद महिंद्रा यांचं ट्विट, Samsung आणि Sony चं टेन्शन वाढलं

9

Apple ने नुकतीच आपले व्हीआर हेडसेट व्हिजन प्रो ला लाँच केले आहे. लाँचिंग सोबत अॅपल व्हिजन प्रोची चर्चा सुरू झाली आहे. खरं म्हणजे अशी चर्चा सुरू आहे की, आगामी काही दिवसात घरातील स्मार्ट टीव्ही दिसणार नाहीत. कारण, स्मार्ट टीव्हीची जागा ऑग्मेंटेड रिएलिटी हेडसेट घेऊ शकतात. एक व्हीआर हेडसेट अॅपलने लाँच केले आहे. हे हेडसेट कोणत्या प्रकारे टेक्नोलॉजीच्या जगात बदल करणार आहेत. याची एक झलक अॅपलच्या वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स काँफ्रेंस मध्ये पाहायला मिळाली आहे. यावरून महिंद्रा एन्ड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले आहे. ते आता चांगलेच व्हायरल झाले आहे.

टिम कुकच्या ट्विटवर आनंद महिंद्रांनी दिला रिप्लाय
खरं म्हणजे अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी एक ट्विट करून अॅपल व्हिजनची माहिती शेअर करीत आपल्या या डिव्हाइसला आधी नाही पाहिले. हे कंप्यूटिंगच्या जगात एक नवीन युगाची सुरुवात आहे. अॅपलचे सीईओच्या ट्विटला रिप्लाय देताना आनंद महिंद्रा यांनी म्हटले की, हे मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीच्या डिस्प्लेच्या डेथचे सिग्नल आहे. त्यांनी असा प्रश्न उपस्थित करून दिग्गज स्मार्ट टीव्ही ब्रँड सोनी आणि सॅमसंग टेन्शनमध्ये आले आहेत.

वाचाः Samsung Galaxy F54 5G ची ९९९ रुपयात बुकिंग, थेट २ हजाराची सूट

काय आहे अॅपल व्हिजन प्रो
अॅपल व्हिजन प्रोची किंमत जवळपास २.८० लाख रुपये आहे. याला पुढील वर्षीच्या सुरुवातीत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. अॅपल व्हिजन प्रोचे हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर अपडेट साठी अॅपलकडून मीरा स्टार्टअप सोबत पार्टनरशीप केली आहे. ते व्हीआर हेडसेट बनवण्याचे काम करीत आहे.

वाचाः Acer चा ३२ इंचाचा एचडी स्मार्ट टीव्ही मिळतोय फक्त ३ हजारात, ग्राहकांची गर्दी

वाचाः अरे वा! आता भाड्यानं घर शोधताना एजंटची गरज नाही, ‘हे’ ५ ॲप्स करतील मदत

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.