Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आता Whatsapp वर फोटो सेंड करतानाही क्वॉलिटी होणार नाही खराब, HD Quality मध्ये पाठवता येणार Photo

10

नवी दिल्ली : Send HD Quality Photos on WhatsApp : सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टन्ट मेसेजिंग ॲप म्हणजे व्हॉट्सॲप आपण सर्वचजण हे वापरतो. चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंग सर्वासाठी व्हॉट्सॲप बेस्ट आहे. पण फोटो सेंड करताना आपण सर्वजण अनेकदा म्हणतो ‘व्हॉट्सॲपवर नको रे, फोटो फाटतील’. पण आता लवकरच व्हॉट्सॲपवर एचडी क्वॉलिटीमध्ये फोटो ट्रान्सफर करणं शक्य होणार आहे. मेटाच्या मालकीच्या या ॲपशी संबंधित एक नवीन बीटा अपडेट समोर आला आहे. व्हॉट्सॲपने नवीन iOS आणि बीटा व्हर्जनसाठी या फीचरची चाचणी सुरू केली आहे.

सध्या व्हॉट्सॲप द्वारे कोणताही फोटो बाय डिफॉल्ट पाठवला तरी तो साईजमध्ये कमी करण्यासाठी त्याची क्लिअरटी कमी केली जाते. त्यामुळेच व्हॉट्सॲपवरून फोटो पाठवल्यावर क्वॉलिटी चांगली राहत नाही, असे अनेकदा लोक म्हणतात. पण आता ही समस्या दूर होणार आहे. व्हॉट्सॲप लवकरच हे फीचर येऊ शकते, ज्याच्या मदतीने वापरकर्ते हाय-क्वॉलिटी फोटोज पाठवू शकतील.

वाचा : iOS 17 Update ने आयफोनचा चेहरामोहरा बदलणार, १० खास फीचर्सनी फोन होणार आणखी खास

सोशल मीडिया कन्सल्टंट Matt Navarra याने प्रथम हे फीचर पाहिलं असून या फीचरचे काही तपशील शेअर करत त्याने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. एचडी गुणवत्तेत फोटो पाठवण्याचा पर्याय स्क्रीनशॉटमध्ये दिसतो. HD गुणवत्तेच्या प्रतिमा अधिक क्लिअर आहेत, परंतु त्या नॉर्मल फोटो सेंड करताना वापरला जातो त्यापेक्षा अधिक डेटा आणि स्टोरेज वापरतात. दरम्यान, WABetaInfo ने WhatsApp च्या आगामी फीचरशी संबंधित आणखी एक माहिती शेअर केली आहे. हे फीचर सध्या iOS बीटा व्हर्जन 23.11.0.76 आणि अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.23.12.13 वर उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, एचडी क्वालिटीचा पर्याय निवडल्यावरही काही प्रमाणात फोटो कॉम्प्रेस होतीलच.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.