Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हेडफोन समजून खरेदी करायला जाऊ नका, किंमत भल्याभल्या लोकांच्या ‘बजेट’बाहेर

8

हेडफोन आहे लगेच खरेदी करू, असं मानणाऱ्यांसाठी ही खास बातमी आहे. कारण, या ठिकाणी आम्ही अशा हेडफोनची माहिती देत आहोत. ज्याची किंमत भल्याभल्या लोकांच्या बजेट बाहेर आहे. कारण, मार्केटमध्ये ६.१९ कोटी रुपये किंमतीचा हेडफोन उपलब्ध आहे. मार्केटमधील सर्वात महाग हेडफोन कोणता आहे, जर तुम्हाला माहिती नसेल तर या ठिकाणी जाणून घ्या.

६ कोटीचा हेडफोन
जगातील सर्वात महागडा हेडफोन बीट्स प्रो आहे. याची किंमत ६.१९ कोटी रुपये आहे. याला बनवण्यासाठी ६.५ कॅरेट सोने आणि रूबीचा वापर केला आहे. सोबत याला बनवण्यासाठी प्लॅटिनमचा सुद्धा वापर करण्यात आला आहे. याला लंडनमधील एक ज्वेलरी कंपनी बनवते. या हेडफोला स्पेशल ऑर्डर दिल्यानंतर बनवले जाते.

१८ कॅरेट गोल्डचा हेडफोन
दुसरा सर्वात महगडा हेडफोन फोकल यटोपिया आहे. याची किंमत जवळपास ८८ लाख रुपये आहे. यात १८ कॅरेट गोल्डचा वापर करण्यात आला आहे.

तिसरा सर्वात महागडा हेडफोन
तिसरा सर्वात महागडा हेडफोन Onkyo H900M डायमंड आहे. याला बनवण्यासाठी २० कॅरेट डायमंडचा वापर करण्यात आला आहे. याची किंमत जवळपास ८२ लाख रुपये आहे.

वाचाः Acer चा ३२ इंचाचा एचडी स्मार्ट टीव्ही मिळतोय फक्त ३ हजारात, ग्राहकांची गर्दी

४३ लाखाचा हेडफोन
या लिस्टमध्ये चौथा हेडफोन हा सेनहायजर ब्रँडचा आहे. या Sennheiser Orpheus/HE 1 हेडफोनची किंमत जवळपास ४३ लाख रुपये आहे.

वाचाः Samsung Galaxy F54 5G ची ९९९ रुपयात बुकिंग, थेट २ हजाराची सूट

१० लाखाचा हेडफोन
जगातील पाचवा सर्वात महगडा हेडफोन हा स्पिरिट टोरिनो वल्केरिया टाइटेनियम टाइटेनियमचा आहे. याची किंमत १२,८०० डॉलर म्हणजेच १० लाख रुपये आहे.

नोटः हे सर्व हेडफोन ऑर्डर दिल्यानंतर बनवले जातात.

वाचाः तुमची बच्चे कंपनी मोबाईलवर काय पाहते? यावर तुम्ही ठेवू शकता कंट्रोल, ‘या’ आहे पाच सोप्या टिप्स

OnePlus Nord Buds 2 Unboxing & First Impression: 2999 में 36 घंटे की बैटरी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.