Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अकरावी प्रवेश प्रक्रियेला विविध महाविद्यालयांमध्ये सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड अशा विभागातील सर्व जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन सुरू आहे. निकालात गुणवत्ता घसरली असली, विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असले तरी नामांकीत महाविद्यालयांकडे अर्ज करण्यासाठी विद्यार्थी, पालकांची गर्दी मोठी आहे. मराठवाड्यात आठ जिल्ह्यांत अकरावी प्रवेशासाठी २ लाख ४४ हजार २०१ प्रवेश क्षमता आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ५५ हजार २५० अशी आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन जूनला दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला. निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांची चाचपणी सुरू आहे. अकरावी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांनी सुरु केली. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांकडून विचारणा होते आहे. अनेक विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया करत आहेत.
राज्य शिक्षण मंडळासह सीबीएसई, आयसीएसई आदी शिक्षण मंडळाचेही निकाल जाहीर झाल्याने हे विद्यार्थी प्रवेश नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये येत आहेत. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका अद्याप न मिळाल्याने ऑनलाइन गुणपत्रिकेच्या आधारे महाविद्यालयांनी सध्या नोंदणीची प्रक्रिया केली. मराठवाड्यात यंदा दहावी उत्तीर्णतेचे प्रमाण नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
प्राविण्य श्रेणी, प्रथम श्रेणीत उत्तीर्णतेचा प्रमाण कमी आहे. असे असले तरी नामांकित संस्थेतील प्रवेशासाठी अधिक चुरस असेल असे चित्र आहे. मराठवाड्यात अडिच लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर आठ जिल्ह्यात २ लाख ४४ हजार २०१ जागांवर अकरावीला प्रवेश दिले जातात. यामध्ये कला, विज्ञान विद्याशाखेची प्रवेशक्षमता मोठी आहे.
विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित अधिक
जिल्ह्यासह विभागात अनुदानित पेक्षा विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित संस्थांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवेश क्षमतेचा मोठा फुगवटा आहे. जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित आणि कला, वाणिज्य, विज्ञान मिळून ७२ हजार ८६० विद्यार्थी क्षमता आहे. जिल्ह्यात दहावीला यंदा उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ५९ हजार ५५० आहे. मागील वर्षी सुमारे १२ हजार जागा रिक्त राहिल्या.
..
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी.. २,५५,२५०
अकरावी प्रवेश क्षमता… २,४४,२०१
..
विभाग जिल्हानिहाय प्रवेश क्षमता..
जिल्हा.. कला विज्ञान वाणिज्य
छत्रपती संभाजीनगर २९,३४० ३६,०४० ७,४८०
बीड २४,०२० २६,१८० ४,०४०
जालना १७,७२० २३,१४० २,९६०
परभणी १४,९६० १६,७२० ३,२००
हिंगोली ७३४० १२१२० २४२०
..
लातूर विभागातील स्थिती..
लातूर ७,२१८ १,९७५ ७५१
नांदेड १२,४३२ १,३६६ ६१७
..
नांदेड एकूण प्रवेशक्षमता … १४,६९९
लातूर एकूण प्रवेशक्षमता.. १०,६०२
धाराशिव एकूण प्रवेश क्षमता २१,२४०
छत्रपती संभाजीनगर प्रवेश क्षमता ७२,८६०
जालना एकूण प्रवेश क्षमता ४३,८२०
बीड एकूण प्रवेश क्षमता ५४,२४०
परभणी प्रवेश क्षमता ३४,८८०
हिंगोली जिल्हा प्रवेश क्षमता २१,८८०
..
जिल्हानिहाय दहावी उत्तीर्ण विद्यार्थी
जिल्हा उत्तीर्ण विद्यार्थी
बीड ३४,००६
लातूर ३५,४५८
छत्रपती संभाजीनगर ५९,५५०
धाराशिव २०,०१४
जालना २८,१८५
परभणी २४,६११
नांदेड ३९,८७३
हिंगोली १३,५३३