Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jio चं हे छोटसं डिव्हाईस मोठ्या कामाचं, JioTag वापराल तर हरवणार नाही कोणंतही सामान

11

नवी दिल्ली :JioTag Blutooth Tracker : आपण सर्वांनीच ट्रँकिंग डिव्हाईसेसबद्दल ऐकलं असेलच पण शक्यतो आपण ते वापरलेले नसतात. पण आता जिओ कंपनीने एक खास बजेटमध्ये येणारे ट्रॅकिंग डिव्हाईस आणले आहे. Jio ने भारतात ब्लूटूथ ट्रॅकिंग डिव्हाइस JioTag लाँच केले आहे. अॅपलच्या एअरटॅगच्या स्पर्धेत हे उपकरण आणण्यात आलं आहे. JioTag Apple AirTag प्रमाणेच कार्य करणार असलं तरी किंमतीच्या बाबतीत परवडणारं आहे.हे जिओटॅग वापरकर्त्याच्या स्मार्टफोनशी जोडण्यासाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी वापरली जाणार असून मग ट्रॅक केलं जाईल. हे डिव्हाईस अगदी हलकं असून ते वापरण्यास देखील सोपं असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नवीन लाँच केलेले हे डिव्हाइस Jio कम्युनिटी फाइंड फीचर सपोर्टसह सादर करण्यात आले आहे.JioTag ची किंमत किती?
तर JioTag हे पांढर्‍या रंगाचे डिव्हाईस असून याची किंमत सध्या ७४९ रुपये ठेवली गेली आहे. कंपनी देशभरातील निवडक पिन कोडवर कॅश-ऑन-डिलिव्हरीसह याची विक्री करत आहे, परंतु इतर ठिकाणी प्रीपेड ऑर्डर देऊन हे डिव्हाईस विकत घेता येईल. डिव्हाइससह बॉक्समध्ये अतिरिक्त बॅटरी आणि केबल देण्यात येते.

JioTag चे खास फीचर्स
बदलण्यायोग्य बॅटरीसह JioTag सादर केले गेले आहे. म्हणजेच, तुम्ही त्याची बॅटरी देखील काढू शकता. याला CR2032 बॅटरी मिळते, जी एक वर्षापर्यंत बॅटरी लाईफ देते. ब्लूटूथ ट्रॅकर वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनला ब्लूटूथ v5.1 वापरून कनेक्ट करता येते. आयटम ट्रॅक करण्यासाठी वापरकर्ते ते त्यांच्या वॉलेटमध्ये, हँडबॅगमध्ये किंवा इतर कोणत्याही पर्सनल गोष्टीसह ठेवू शकतात. हे एका खास केबलसह देखील येते, ज्यामुळे ट्रॅकरला इतर वस्तूंशी जोडणे सोपे होते. घरामध्ये २० मीटरपर्यंत आणि घराबाहेर ५० मीटरपर्यंत ट्रॅकिंग रेंज हे डिव्हाईस देते. JioTag चे वजन ९.५ ग्रॅम आहे. नियमित वापराच्या वस्तू शोधण्याव्यतिरिक्त, ट्रॅकरचा वापर वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनला ट्रॅक करण्यासाठीही केला जाऊ शकतो. JioTag वर डबल-टॅप केल्याने फोन सायलेंट मोडमध्ये असतानाही फोन वाजतो. त्यामुळे परवडणाऱ्या किंमतीत बरेच फीचर या डिव्हाईसमध्ये कंपनी देत असल्याने ही एक भारी खरेदी आहे.

वाचा : Amazon India झालं १० वर्षांचं, लाँचिंगवेळी सर्वात आधी विकल्या गेल्या होत्या ‘या’ १० गोष्टी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.