Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Asteroid towards Earth : बापरे! ११० फुटांचा विमानाएवढा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने, NASA चा इशारा

10

नवी दिल्ली : 110 feet Asteroid towards Earth : गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आजदेखील एक भव्य असा तब्बल ११० फुटांचा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असल्याची माहिती नासा या अंतराळ संस्थेने दिली आहे. दरम्यान पृथ्वीच्या जवळ येणारे हे लघुग्रह मोठा धोका देखील बनू शकतात, असंही नासाने सांगितलं असून नासा ही अंतराळ संस्था या लघुग्रहांवर सतत लक्ष ठेवते. तर आजच्या या लघुग्रहाबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

लघुग्रहांचा मागोवा घेण्यासाठी नासाने जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) तयार केली आहे, जी लघुग्रहांच्या दिशा आणि वेगावर लक्ष ठेवते. जेपीएलनुसार आज एक महाकाय लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे. त्याचे नाव Asteroid 2023 LL आहे. हा ११० फुटांचा लघुग्रह जवळपास एका मोठ्या विमानाइतका आहे. हा साईजमध्ये मोठ्या आकाराचा असल्याने हा लघुग्रह पृथ्वीवर आल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतो. नासाने म्हटले आहे की लघुग्रह 2023 LL पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर पोहोचेल तेव्हा दोघांमधील अंतर २,११०,००० किमी असेल. म्हणजेच सुमारे २१ लाख किलोमीटर अंतरावरून हा जाणार आहे. तर आपल्या या सूर्यमालेत हजारो लघुग्रह आहेत. ते देखील ग्रहांप्रमाणेच सूर्याभोवती फिरतात. कधीकधी ते ग्रहांच्या कक्षेत देखील आढळतात. त्याचप्रमाणे प्रदक्षिणा घालताना ते ग्रहाच्या दिशेनेही येतात. यालाच लघुग्रह म्हणतात. दरम्यान नासाने अद्याप अॅस्टेरॉइड 2023 LL पासून धोक्याची कोणतीही माहिती दिलेली नाही. पण अवकाश शास्त्रज्ञ सतत त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.

कसा ओळखतात लघुग्रहाचा धोका?
नासा तसंच इतर रिसर्च सेंटर्स लघुग्रहांचा धोका ओळकण्यासाठी टेलिस्कोप तसंच NEOWISE सारखे observatories वापरत असतात. यांनी लघुग्रहांना ट्रॅक केलं जातं.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.