Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दमदार बॅटरी लाईफ, मोठा डिस्प्ले, किंमत फक्त १५.५ हजार, पाहा हा स्वस्तात मस्त लॅपटॉप

10

नवी दिल्ली :Budget Laptop Under 20k : जर तुम्ही २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी भारतात विक्री होणार काही स्वस्तात मस्त पर्याय आणले आहेत. २० हजारहून कमी बजेटमध्ये ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर दोन लॅपटॉप विक्रीसाठी आहेत. या लॅपटॉप्सवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटसह त्यांचे खास फीचर्स पाहूया…

Lenovo IdeaPad Slim 3 Chromebook ची किंमत
Lenovo IdeaPad Slim 3 Chromebook ची मूळ किंमत ३९,९९० रुपये आहे, पण आता तब्बल ५३ टक्के सवलतीनंतर हा लॅपटॉप १८,९९० रुपयांना मिळत आहे. बँक ऑफरबद्दल बोलायचं झाल्यास, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर १० टक्के सूट (जवळपास १५००) मिळू शकते, त्यानंतर किंमत ही अगदी १७,४९० रुपये होईल.

Lenovo IdeaPad Slim 3 Chromebook फीचर्स
यालॅपटॉपच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर Lenovo IdeaPad Slim 3 Chromebook मध्ये १४ इंचाचा FHD IPS डिस्प्ले आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर या लॅपटॉप मध्ये Intel Celeron N4020 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा एक टचस्क्रीन लॅपटॉप आहे, जो एक हलका आणि स्लिम लॅपटॉप आहे. लॅपटॉपच्या स्टोरेजबद्दल बोलायचं झालं तर या लॅपटॉपमध्ये 4GB/64GB स्टोरेज देण्यात आला आहे. हा लॅपटॉप क्रोम ओएसवर काम करतो. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचं झालं तर या लॅपटॉपमध्ये दिलेली बॅटरी १० तासांपर्यंत टिकू शकते. या लॅपटॉपचं वजन १.४ किलो आहे.

AXL Laptop (Vayu Book) ची किंमत
AXL लॅपटॉप (Vayu Book) ची मूळ किंमत ३१,९९० रुपये आहे, यावर ४७ % डिस्काउंटनंतर याची किंमत १६,९९० रुपये होणार आहे. बँक ऑफरनुसार बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर १० टक्के म्हणजेच जवळपास १५०० रुपये सूट मिळून हा लॅपटॉप १५,४९० रुपयांना मिळू शकतो.
AXL Laptop (Vayu Book) चे फीचर्सया
या AXL लॅपटॉप (Vayu Book) मध्ये १४.१ इंचाचा FHD IPS डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 1920×1080 पिक्सेल आहे. या लॅपटॉपमध्ये UHD ग्राफिक्स 600 देण्यात आले आहे. या लॅपटॉपमध्ये 7.4V/5000mAH बॅटरी आहे जी दीर्घकाळ टिकू शकते. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर या लॅपटॉपमध्ये 4GB/128GB SSD स्टोरेज देण्यात आले आहे. हा लॅपटॉप विंडोज ११ वर काम करतो.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.