Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jio Fiber : वेगवान इंटरनेटसह, नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओचीही मजा, जिओचे ‘हे’ प्लान आहेत एकदम बेस्ट

16

नवी दिल्ली : Jio Fiber Plans Price : आजकाल इंटरनेटचा वापर सर्वच क्षेत्रात फारच वाढला आहे. म्हणजे फक्त मनोरंजनासाठीच नाही तर ऑनलाईन शिक्षणापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत सर्वकाही इंटरनेटवर अवलंबून असतं. त्यामुळे आजकाल प्रत्येकाला मोबाईलमध्ये तसंच घरी इंटरनेट फारच गरजेचं असतं. आजकाल विविध कंपन्यांच्या फायबर प्लान्समुळे घरोघरी इंटरनेट आलं आहे. दरम्यान फायबर इंटरनेट पुरवण्यात आघाडीवर असणारी कंपनी रिलान्स जिओचे देखील प्लान अगदी भारी आहेत. या प्लान्समध्ये दमदार डेटा मिळणारच असून सोबत सर्वाधिक वापरले जाणारे OTT सेवांचे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध होणार आहेत. चलातर Reliance Jio च्या खास प्लानसबद्दल जाणून घेऊ..

१,४९९ रुपयांचा जिओ फायबर प्लॅन
रिलायन्स जिओचा 1499 रुपयांचा जिओ फायबर प्लॅन अमर्यादित डेटा ऑफर करतो. या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ग्राहकांना 300Mbps स्पीडने इंटरनेट दिले जाते. जिओचा हा फायबर प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. रिलायन्स जिओच्या १४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये Jio ॲप्सचा मोफत प्रवेश मिळतो. या प्लॅनमध्ये JioCinema, JioSaavn चा प्रवेश देखील समाविष्ट आहे. रिलायन्स जिओ फायबर प्लॅनमध्ये, ग्राहकांना नेटफ्लिक्स बेसिक प्लान , ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या मोफत OTT सबस्क्रिप्शन मिळतात. याशिवाय Disney + Hotstar, Sony Liv, यांसारख्या ॲप्सवर मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

२,४९९ रुपयांचा जिओ फायबर प्लॅन
जिओ फायबरचा हा प्लान 500Mbps च्या अपलोड आणि डाउनलोड स्पीडसह येतो. यामध्ये अनलमिटेड डेटा मिळणार आहे. तसंच ५५० पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल आणि फ्री कॉलिंगचं बेनिफिटही मिळणार आहे.रिलायन्स जिओच्या या फायबर प्लॅनमध्ये, ग्राहकांना नेटफ्लिक्स स्टॅँडर्ड, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या मोफत OTT सबस्क्रिप्शन मिळतात. याशिवाय Disney + Hotstar, Sony Liv, यांसारख्या ॲप्सवर मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाणार आहे.

३,९९९ रुपयांचा जिओ फायबर प्लॅन
जिओ फायबरचा हा प्लान एकदम फास्ट असून 1gbps च्या अपलोड आणि डाउनलोड स्पीडसह येतो. यामध्ये देखील अनलमिटेड डेटा मिळणार आहे. तसंच ५५० पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल आणि फ्री कॉलिंगचं बेनिफिटही मिळणार आहे.रिलायन्स जिओच्या या फायबर प्लॅनमध्ये, ग्राहकांना ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या मोफत OTT सबस्क्रिप्शन मिळतात. याशिवाय Disney + Hotstar ॲपच देखील मोफत सबस्क्रिप्शन मिळणार असून खास म्हणजे नेटफ्लिक्सचं प्रिमीयम व्हर्जन मिळेल.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.