Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
स्मार्टफोन अपडेट न करणं
कितीतरी अँड्राईड युजर्स करत असलेली एक मोठी चूक म्हणजे ते कंपनीने दिल्यानंतर देखील आपल्या फोनला लेटेस्ट सॉफ्टवेअरवर अपडेट करत नाहीत. प्रत्येक अपडेट हे जुन्या बग्स आणि प्रॉब्लेम्सना फिक्स करतं. नव्या अपडेट्समुळे फोनचा ऑप्टिमाइज्ड परफॉर्मन्स वाढतो तसंच बॅटरी लाईफही सुधारते. पण जर तुम्ही नवीन अपडेट केला नाही तर मधील इश्यूस तसेच राहून फोनला प्रॉब्लेम होऊ शकतो.
वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान
होम स्क्रिनवर जास्तीत जास्त विजेट्स ठेवणे
स्मार्टफोनच्या होम स्क्रिनवर अधिकाधिक अॅप्सचं शॉर्टकट किंवा विजेट्स ठेवणंही फोनला स्लो करु शकतं. कारण स्क्रिनवर जितके जास्त अॅप्स किंवा शॉर्टकट असतील तितका फोनचा परफॉर्मन्स स्लो होणार आणि फोन स्लो होणार. कारण या अॅप्समुळे फोन लोड होण्यास वेळ घेणार आणि फोन स्लो होणार.
वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये
फोनमध्ये कमी स्टोरेज ठेवणं
जर तुम्ही अशा युजर्सपैकी आहात, ज्यांचा फोन कायमचं स्टोरेजच्या बाबतीत भरलेला असतो आणि फोटो किंवा नवीन अॅपसाठी तुम्हाला फोनमध्ये स्पेस बनवावा लागत असेल तर तुमचा फोन नक्कीच स्लो होऊ शकतो. कारण फोनमध्ये जास्तीत जास्त गोष्टी भरल्याने कमी मेमरीवर फोनला हवा तसा परफॉर्मन्स करता येत नाही, ज्यामुळे फोन आपोआप स्लो होऊ लागतो.
वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो
फोन रिस्टार्ट न करणं
अनेकजण हे फोन गरज लागली नाही तर कधीच फोन रिस्टार्ट करत नाहीत. आपण दिवसभर फोन वापरतो. कधी चार्जिग पूर्ण संपला की फोन बंद होतो. पण शक्यतो सगळे कायम फोनला चार्गिंग ठेवतात. त्यामुळे फोन कधीच बंद होत नाही आणि त्याला आराम मिळत नाही अशामध्ये कधी कधी फोनन रिस्टार्ट करणं फोन स्लो होऊ नये यासाठी बेस्ट असतं.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
फोन सतत डिस्चार्ज होणं
अनेकांचा फोनवरील वापर खूप अधिक असतो. पण यामुळेच फोनची बॅटरीही पटापट उतरु शकते. अनेकजणांचा फोन चार्जिंगअभावी अनेकदा बंद असतो. अशात फोन वेळेवर चार्ज नाही केला तर सतत कमी बॅटरीवर फोन वापरल्यास फोनवर दबाव पडतो. बॅटरी सेव्हरही सतत करणं तोट्याच आहे.
वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच