Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तुम्हीही Windows 11 वापरता? या ५ फीचर्समुळे आणखी वाढेल कम्प्युटरची सुरक्षा

8

VPN फीचर झालं अपडेट

मायक्रोसॉफ्टचं म्हणणं आहे की विंडोज ११ मधील अपडेटेड व्हीपीएन फीचर हे सुरक्षिततेसाठी अपडेट केलं गेलं आहे. यासाठी टास्कबारमध्ये एक लहान शील्ड आयकॉन असेल. तो कस्टमाईज देखील केला जाऊ शकतो. तसेच, Windows 11 वर काम करणारे PC Pluton Security सह येतात. यामुळे सिस्टमवर मालवेअर आणि सायबर हल्ल्याचा धोका कमी होतो.

वाचा : WhatsApp Tricks : तुम्हाला व्हॉट्सॲपवर कोणी ब्लॉक केलंय का? या सोप्या ट्रिकने लगेच कळेल…​

स्टार्ट मेनूमध्ये रिअल-टाइम अलर्ट

स्टार्ट मेनूमध्ये रिअल-टाइम अलर्ट

विंडोज ११ च्या या नवीन अपडेटसह, वापरकर्त्यांना सिस्टमच्या स्टार्ट मेनूमध्ये रिअल टाइम अलर्ट मिळतील. याच्या मदतीने यूजर्सचे पर्सनल डिटेल्स आणि फाइल्स सुरक्षित ठेवता येतील. कंपनीने सांगितले आहे की आगामी काळात आणखी अनेक सुरक्षा फीचर्स दिले जाणार आहेत.

​वाचा : Video Editing Apps: रिल्स, स्टोरी बनवण्यासाठी सोपे व्हिडीओ एडिटिंगॲप्सशोधताय? ‘हे’ आहेत टॉप ५ ॲप्स​

पेंट ॲपसाठी डार्क मोडची चाचणी सुरु

पेंट ॲपसाठी डार्क मोडची चाचणी सुरु

काही फीचर्सची टेस्टिंग अजूनही सुरू आहे. या नव्या अपडेटद्वारे पेंट
ॲपमध्ये डार्क मोड उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, हे फिचर कधीपर्यंत उपलब्ध करून दिले जाईल, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

व्हॉल्यूम मिक्सर

व्हॉल्यूम मिक्सर

या फीचरद्वारे, वापरकर्ते पीसीचा आवाज स्वतः एडजस्ट करु शकणार आहेत. हे इनसाइडर प्रिव्ह्यू व्हर्जनच्या अंडर रोलआउट करण्यात आलं आहे. या फीचरची देखील सध्या त्याची चाचणी सुरू आहे.

वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

Free Laptop Scam पासून रहा सावध

free-laptop-scam-

भारत सरकारच्या नावाने इंटरनेटवर एक नवा घोटाळा सुरू आहे. हा घोटाळा अनेक दिवसांपासून सुरू असून त्यात अनेकजण अडकले आहेत. या घोटाळ्यात लॅपटॉप मोफत देण्याच्या नावाखाली घोटाळेबाज युजर्सची फसवणूक करत आहेत. याा स्कॅममध्ये स्कॅमर एक संदेश पाठवतात, की भारत सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे आणि लोक अधिकृत वेबसाइटवर तपशील देऊन त्याचा लाभ घेऊ शकतात.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.