Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

108MP कॅमेरा आणि 45W च्या फास्ट चार्जिंग सोबत भारतात हा स्मार्टफोन लाँच, किंमत खूपच कमी

8

Infinix ने भारतात आपला नवीन फोन Infinix Note 30 5G ला लाँच केले आहे. या फोनमध्ये 108 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि मीडियाटेक Dimensity 6080 प्रोसेसर दिले आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. या सोबत 45W ची वायर्ड चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

Infinix Note 30 5G ची किंमत
या फोनला ४ जीबी रॅम सोबत १२८ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले असून या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. अॅक्सिस बँकेच्या कार्डवरून पेमेंट केल्यास १ हजार रुपयाची सूट दिली जाते.

वाचाः Xiaomi Pad 6 भारतात लाँच, ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

फोनची स्पेसिफिकेशन

Infinix Note 30 5G मध्ये अँड्रॉयड 13 आधारित XOS 13 मिळेल. याशिवाय, या फोनमध्ये ६.७८इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस ५८० निट्स दिले आहे. या फोनमध्ये मीडियाटेक Dimensity 6080 प्रोसेसर सोबत ग्राफिक्ससाठी Mali G57 MC2 GPU, ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे.

वाचाः ४० रुपये कमी किंमतीतील जिओचा हा रिचार्ज ठरला हिट, १२ जीबी एक्स्ट्रा डेटा आणि फ्री कॉलिंग

फोनचा कॅमेरा

Infinix Note 30 5G मध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहे. ज्यात प्रायमरी लेन्स १०८ मेगापिक्सलचा दिला आहे. अन्य लेन्स संबंधी अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. फ्रंट साठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये JBL साउंड सोबत Hi-Res ऑडियो मिळते. Infinix Note 30 5G मध्ये 5G, 4G, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, NFC, 3.5mm ऑडियो जॅक, टाईप-सी पोर्ट आणि फिंगरप्रिंट सेंसर दिले आहेत. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ज्यात 45W ची फास्ट चार्जिंग दिली आहे.

वाचाः कूलर देईल एसीसारखी हवा, फक्त या ५ टिप्स फॉलो करा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.