Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- स्वातंत्र्यदिनी पोलिसांना टीप मिळाली अन्…
- गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करी वाढली
- धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणारे आणि दारू तस्करांचे धाबे दणाणले
वाहन चालक खुशाल गंगाराम बोरकुटे रा. किस्तापुर, ता.चामॉर्शी, जिल्हा गडचिरोली यांचेकडे केलेल्या चौकशीत पडून गेलेले इसम 1) विश्वजित राप्तान ठाकूर,२) राजू राप्तान ठाकूर, ३) कुमरीस राप्तान ठाकूर,४) असीम राप्तान ठाकूर, सर्व रा. चित्तरंजनपुर ५) शंकर सुखदेव राय रा. बोरी असे सांगितले.
पोलीसांनी केलेल्या तपासणीत गाडीच्या आतील कप्यामध्ये ९० ml मापाने भरलेले १०० निपा याप्रमाणे २५८ देशी दारूचे बॉक्स असे एकूण २५८०० नीपा किंमत १८ लाख ६ हजार तसेच आयसर वाहनांची किंमत १० लाख असा एकूण २८ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल पकडण्यात आले. सादर कारवाई अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर व त्यांचे पथक नापोशी/२३९५ मनोज कूनघाडकर, चानापोशी/३४९६ श्रीकांतभांडे , चापोशी/३०११ नितीन पाल, पोशी/५३८३ वडजू दहिफडे, पोशि/३७१३ उधव पवार, एसपीओ तिरुपती मडावी, कुणाल संतोषवार यांनी केली असून पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी हे करीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठल्यावर गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करी वाढली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी अहेरी येथील प्रभार घेतल्यावर त्यांनी एकापाठोपाठ एक अशी धडक कारवाई करत असल्याने परिसरातील अवैध धंदे करणारे आणि दारू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. नुकतेच त्यांच्या पथकाने मुलचेरा तालुक्यात एका चारचाकी वाहनसह ७५ हजार ९०० रुपयांची विदेशी दारू जप्त करून दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.ही घटना ताजी असतानाच पुन्हा २८ लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात त्यांना मोठं यश मिळालं आहे हे विशेष.