Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Airtel Xstream युजर्ससाठी आनंदाची बातमी, एका रिचार्जमध्ये तब्बल १५ ओटीटी ॲप्सची मजा

8

नवी दिल्ली : Airtel Broadband Service : एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी भारी ऑफर आणली आहे. ही ऑफर एअरटेलच्या ब्रॉडबँड प्लानसाठी म्हणजे Airtel Xstream सर्व्हिससाठी दिली गेली आहे. या ऑफरमध्ये १५ हून अधिक OTT ॲप्सचं सब्सक्रिप्शन मिळत आहे. एअरटेल या दमदार अनलिमिटेड प्लान्समध्ये Airtel Xstraeam Play चे अतिरिक्त बेनिफिट्स देखील ऑफर करत आहे. चलातर नेमका हा प्लान काय आहे? आणि कोणकोणते फायदे ग्राहकांना मिळणार आहेत, ते जाणून घेऊ…

तर कंपनीने आपल्या एक्सट्रिम ब्रॉडबँडला आता Airtel Xstraeam Play असं नाव देत रिब्रँडिंग केलं आहे. यामुळे एक नवा लुक तसंच भारीभारी फीचर्स ग्राहकांना मिळणार आहेत. याआधीच्या प्लान्समध्ये एअरटेल कमी ओटीटी सब्सक्रिप्शन्स देत होते. पण आता या ओटीटी सब्सक्रिप्शन्सची संख्या वाढवली आहे. नव्याने समोर येणाऱ्या माहितीनुसार एअरटेल १५ पेक्षा जास्ती ओटीटी ॲप्सचं सब्सक्रिप्शन देणार आहे. यामध्ये ९९९ रुपये, ८३९ रुपये, ४९९ रुपये, ३९९ रुपये आणि ३५९ रुपयांचे प्लान असून हे सर्व अनलिमिटेड पॅक्स आहेत. विशेष म्हणजे यात १५ पेक्षा अधिक OTT सब्सक्रिप्शन्सची सेवा मिळणार आहे. यासाठी एक खास डेटा पॅक देखील आहे.

१४८ रुपयांचा डेटा पॅक मिळतील १५+ OTT
Airtel ने एक खास असा १४८ रुपयांचा डेटा पॅक असन यामध्ये सध्याच्या प्लानच्या व्हॅलिडिटीसह १५जीबी डेटा देखील मिळतो. यामध्येच १५ हून अधिक नवे सब्सक्रिप्शन्स मिळणार आहेत. यात २८ दिवसांपर्यंत युजर्स आपल्याला हव्या त्या ओटीटीची मजा घेऊ शकतील.

कोणते OTT सब्सक्रिप्शन्स मिळणार?
यामध्ये SonyLIV, ErosNow, LionsgatePlay, Ultra, ManoramaMax, HoiChoi, Epic ON, ShemarooMe, Divo, Dollywood, Nammaflix, Klikk. ShortsTV , Docubay, HungamaPlay, Social Swag & Chaupal हे सारे ओटीटी सब्सक्रिप्शन्स मिळणार आहेत.

वाचा : Mobile Photography : सुट्टीमध्ये फिरायला गेल्यावर फोनमध्येच भारी फोटो कसे काढाल? ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.