Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​Aadhar Update : मोफत ऑनलाइन आधार अपडेटची तारीख वाढवली, १४ जून नाही ‘या’ तारखेपर्यंत आहे संधी

6

१४ सप्टेंबरपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही

तर आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं डॉक्यूमेंट असल्याने ते अपडेटेड असणं गरजेचं आहे. सध्यातरी वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार आधार ऑनलाइन आणि ऑफलाइन अपडेट करू शकतात. कारण ऑफलाइन अपडेटसाठी तुम्हाला ई-सेवा केंद्रात शुल्क भरावे लागत असलं तरी ऑनलाइन आधार अपडेट मोफत ठेवण्यात आले आहे. या मोफत अपडेटची मुदत १४ जूनला संपत होती पण ती आता वाढवून १४ सप्टेंबर केली गेली आहे. त्यामुळे तुम्ही अद्याप आधार अपडेट केले नसेल, तर अदूनही तुम्ही आधार ऑनलाइन मोफत अपडेट करू शकता.

​वाचा – चूकीच्या UPI ID वर केलं पेमेंट, घाबरु नका, ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा संपूर्ण रिफंड

नंतर किती रुपये आकारले जाऊ शकतात?

नंतर किती रुपये आकारले जाऊ शकतात?

तर याआदी १४ जून ही मोफत आधार अपडेटची तारीख सांगितली गेली होती. दरम्यान १४ जून नंतर तुमचे आधार अपडेट केले तर तुम्हाला ५० रुपये अनिवार्य शुल्क भरावा लागेल असं सांगितलं गेलं होतं. दरम्यान ही तारीख आता १४ सप्टेंबर केली आहे. त्यामुळे त्यानंतर देखील आधार अपडेटसाठी शुल्क आकारले जाऊ शकते.तर १५ मार्च ते १४ सप्टेंबर या कालावधीत UIDAI द्वारे ऑनलाइन आधार अपडेट मोफत करण्यात येईल.

​वाचा : १८ जूनला Father’s Day, वडिलांना गिफ्ट करण्यासाठी हे आहेत परफेक्ट ऑप्शन

मोफत ऑनलाईन आधार अपडेट कसं कराल?

मोफत ऑनलाईन आधार अपडेट कसं कराल?

सर्वात आधी http://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर भेट द्या. मग आधार कार्ड आणि त्याला लिंक मोबाईलनंबरवरील ओटीपीच्या मदतीने लॉगिन करा. त्यानंतर ‘Name/Gender/Date of Birth & Adress Update’ हा पर्याय निवडा. त्यानंतर ‘Update Aadhaar Online’ पर्यायावर क्लिक करा. मग डेमोग्राफिक ऑप्शन्सच्या यादीत Adress पर्याय निवडा मग ‘Proceed to Update Aadhaar’ पर्यायावर क्लिक वरा. त्यानंतर तुम्हाला जो देखील अपडेट करायचा आहेत्या डॉक्यूमेंटची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. कोणतीही फी न भरता तुमची रिक्वेस्ट अपडेट होई आणि तुम्हाला सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (SRN) मिळेल, तुमच्या रिक्वेस्टचं स्टेटस बघण्यासाठी तुम्ही हा नंबर वापरु शकता.

वाचा: UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

​अपडेट रिक्वेस्टची स्थिती कशी जाणून घ्याल?

​अपडेट रिक्वेस्टची स्थिती कशी जाणून घ्याल?

जर तुम्ही ऑनलाइन अॅड्रेस बदलण्याची विनंती यशस्वीरीत्या सबमिट केल्यावर, तुम्हाला 0000/00XXX/XXXXX फॉरमॅटमध्ये एक URN नंबर दिला जाईल.हा स्क्रीनवरही दिसतो आणि नोंदणीकृत टेलिफोन नंबरवर एसएमएसद्वारे पाठवला जातो. हा URN आणि तुमचा आधार क्रमांक वापरून तुमच्या आधार अपडेटची स्थिती येथे पाहण्यासाठी खालील साईट वापरा… https://ssup.uidai.gov.in/checkSSUPStatus/checkupdatestatus.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

​या केसेसमध्ये होतो आधारमध्ये बदल

​या केसेसमध्ये होतो आधारमध्ये बदल

तर UIDAI वेबसाइटनुसार, “लग्नासारख्या जीवनातील बदलांमुळे व्यक्तीचे आधारवरी नाव आणि पत्ता यांसारखे मूलभूत बदल होत असतात. तसंच नवीन ठिकाणी स्थलांतर झाल्यामुळे पत्ता आणि मोबाईल नंबर देखील बदलू शकतो. रहिवाशांना त्यांच्या नातेवाइकांच्या तपशिलांमध्ये विवाह, एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू इत्यादी जीवनातील बदलांमुळे देखील बदल हवा असतो. त्याव्यतिरिक्त, रहिवाशांना त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल पत्ता इ. बदलण्यासाठी इतर वैयक्तिक कारणांमुळे आधारमध्ये बदल करु शकतात.”

वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.