Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘ChatGPT मुळे माझी नोकरी गेली, प्लंबर होण्यास भाग पाडलं’, ३४ वर्षीय कॉपी रायटरची व्यथा

11

नवी दिल्ली : Man Loses Job due to ChatGPT : सध्या AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही संकल्पना फारच चर्चेत आहे. AI Chatbot ChatGPT ने तर मागील काही महिन्यांत अख्ख मार्केट जाम केलंय. पण याच एआय आधारित चॅटबॉट्सची घोषणा झाल्यापासून अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील अशी भीती वर्तवली जात होती. असं काही लोकांसोबत होऊ देखील लागलं असून. ChatGPT मुळे लोक त्यांच्या नोकऱ्या गमावत असल्याचं एका व्यक्तीच्या तक्रारीतून समोर आलं आहे. ChatGPT मुळे एका व्यक्तीला आपली कॉपी रायटरची नोकरी गमवावी लागली आणि आता त्याला प्लंबर म्हणून काम करावं लागत असल्याचं संबधित व्यक्तीने सांगितलं आहे.तरआर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI च्या आगमनाने लोकांच्या नोकऱ्यांना धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. एआयमुळे नोकऱ्या संपतील अशी भीती अनेकांना वाटत होती आणि आता तसं समोरही येत आहे. कारण अमेरिकेतील एरिक फिन या ३४ वर्षीय कॉपी रायटरने वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की तो एका टेक स्टार्टअपमध्ये कॉपी रायटर म्हणून काम करायचा, परंतु कंपनीला आता त्याची गरज नाही. कारण कंटेंटसाठी कंपनी आता AI आधारित ChatGPT वर अवलंबून आहे. त्यामुळे आता त्याला प्लंबर, टेक्नीशिअन अशी कामं करावी लागत आहेत. दरम्यान एआय प्रत्येकाची नोकरी संपवू शकत नाही, परंतु काही क्षेत्रांवर याचा परिणाम नक्कीच होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत देखील घडला आहे, जिला नोकरी गमावल्यानंतर डॉग वॉकर म्हणून काम करावे लागले.

वाचा : जर प्राणी माणसांसारखे दिसले असते तर? AI नं तयार केलेले हे ‘विचित्र’ फोटो पाहिले का?

ChatGPT म्हणजे काय?
चॅट जीपीटी (ChatGPT) म्हणजे काय तर कोणत्याही प्रकारची माहिती आपल्याला या साईटवर एका क्लिकवर मिळू शकते. आपले कितीतरी ऑनालाईन टास्कही हे ChatGPT करु शकतं. वैज्ञानिक शब्दात ChatGPT ला एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन म्हणू शकतो. तरुण आणि तांत्रिक क्षेत्रातील जाणकार आजकाल सोशल साईट्सवर यावर सतत चर्चा करताना दिसत आहे. दरम्यान ChatGPT बनवणाऱ्या कंपनीने आता एक खास OpenAI Bug Bounty प्रोग्राम आणला आहे.

वाचा – चूकीच्या UPI ID वर केलं पेमेंट, घाबरु नका, ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा संपूर्ण रिफंड

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.