Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार १४५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५ हजार ८११ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण १०० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या १०० रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर मात्र २.११ टक्क्यांवरच आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ९५ हजार ७४४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘जातीयवादा’च्या आरोपानंतर शरद पवार यांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले…
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत किंचित वाढ
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६२ हजार ४५२ वर आली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १४ हजार ६१० इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ६ हजार ९३८ सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ६ हजार ९०९ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ५ हजार ८९५ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ८४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सोलापुरात ५ हजार ४६५ इतके रुग्ण आहेत.
क्लिक करा आणि वाचा- आता थेट गडकरींना पत्र लिहून विचारणार ‘हे’ प्रश्न; मंत्री उदय सामंत म्हणाले…
मुंबईत २९३५ सक्रिय रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या किंचित कमी होत ती २ हजार ९३५ वर आली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ७४१, सिंधुदुर्गात १ हजार ५०४, बीडमध्ये १ हजार ४१२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ११५ इतकी आहे. रायगडमध्ये १ हजार ०८८ इतके रुग्ण आहेत.
नंदुरबारमध्ये एकही रुग्ण नाही
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४८३, नांदेडमध्ये ही संख्या ४६ इतकी आहे. जळगावमध्ये ३१५, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १५३ इतकी झाली आहे. अमरावतीत ही संख्या ५० वर खाली आली आहे. तर यवतमाळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १८ इतकी आहे. तसेच, धुळ्यात ही संख्या ४ इतकी आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी २ सक्रिय रुग्ण आहे. तर नंदुरबारमध्ये आज एकही रुग्ण नाही.
क्लिक करा आणि वाचा- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांबाबत केले ‘हे’ वक्तव्य
३,५३,१२९ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ११ लाख ११ हजार ८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ९६ हजार ८०५ (१२.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ५३ हजार १२९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ५३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.