Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Google Maps : सुट्टीत फिरायला जाताना गुगल मॅप्सचे ‘हे’ तीन फीचर्स येतील खूप कामी, वाचा सविस्तर

16

ग्लान्सेबल डायरेक्शन्स

गुगल मॅप्समध्ये ग्लान्सेबल डायरेक्शन्स फीचर सुरू करण्यात आलं आहे. ही सेवा वापरुन युजर्स लॉक स्क्रीनच्या माध्यमातून देखील आपला रस्ता ट्रॅक करु शकतात. हे फीचर चालू केल्यानंतर, वापरकर्त्यांना पुढे येणारे वळण किंवा कोणत्याही अपडेटबद्दल कळवले जाईल. यापूर्वी ही माहिती फक्त फुल नेव्हिगेशन मोडमध्ये दिली जात होती. हे फीचर्स काही महिन्यांतच जगभरात आणले जाईल. हे वॉकिंग, सायकलिंग आणि ड्रायव्हिंग मोडमध्ये मदत करेल. हे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाईसवर उपलब्ध करून दिले जाईल.

वाचा : जर प्राणी माणसांसारखे दिसले असते तर? AI नं तयार केलेले हे ‘विचित्र’ फोटो पाहिले का?

​रिसेंट ॲप्समध्ये लोकेशन होणार सेव्ह

​रिसेंट ॲप्समध्ये लोकेशन होणार सेव्ह

Google ने Google मॅप्समध्ये एक नवीन सेवा जारी केली आहे जी वापरकर्त्यांना Google मॅप्सची विंडो बंद केल्यावरही त्यांच्या रिसेंट
​ॲप्समध्ये लोकेशन सेव्ह करुन ठेवण्याची सोय करुन देतील. वापरकर्त्यांना त्यांनी यापूर्वी भेट दिलेली सर्व ठिकाणे हटवण्याची परवानगी आहे. हे फीचर वापरकर्त्यांना पिकनिक किंवा विशिष्ट ठिकाणी जाताना त्यादरम्यान विश्रांती घेतल्यावरही जिथे प्रवास थांबवला तिथून पुढे सुरु करता येणार आहे.

वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

​इमर्सिव्ह View

-view

Google ने अलीकडेच अॅमस्टरडॅम, डब्लिन, फ्लॉरेन्स आणि व्हेनिस या चार शहरांमध्ये इमर्सिव्ह View सादर केलं आहे. लवकरच इतर ठिकाणीही हे फीचर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये, प्रगत AI तंत्रज्ञानाचा वापर करून, इमर्सिव्ह व्ह्यू फीचर अगदी वास्तवदर्शा स्थान, ठिकाणं तयार करते. यामध्ये अनेक महत्त्वाच्या माहितीचाही समावेश करण्यात आला आहे.

​वाचा : Aadhar Update : मोफत ऑनलाइन आधार अपडेटची तारीख वाढवली, १४ जून नाही ‘या’ तारखेपर्यंत आहे संधी

रिसेन्टर

रिसेन्टर

हे गूगल मॅप्समधील फीचर तसं जुनचं आहे, पण सर्वात कामाचं फीचर आहे. कारण आपण गुगल मॅपच्या मदतीने कुठेही जात असताना थोडं जरी आपल्या मोबाईलची दिशा बदलली आणि आपल्याला आपला ट्रॅक दिसत नसेल तर रिसेन्टरवर क्लिक करताच आपण पुन्हा ट्रॅकवर येतो. तसंच मॅप पाहताना एखादं दुसरं ठिकाण आपण मॅपमध्ये पाहत असू तरी आपला ट्रॅक भरकटतो पण रिसेन्टरवर क्लिक करताच आपण पुन्हा ट्रॅकवर येतो.

वाचा : १८ जूनला Father’s Day, वडिलांना गिफ्ट करण्यासाठी हे आहेत परफेक्ट ऑप्शन

हवं ते वाहन किंवा वॉकिंग ऑप्शन सिलेक्ट करणं

हवं ते वाहन किंवा वॉकिंग ऑप्शन सिलेक्ट करणं

आता हे फारच कॉम आणि सर्वांना माहित असलेलं फीचर आहे. आपण कधीही गुगल मॅप्स वापरताना आपल्याला हवं असलेलं लोकेशन टाकतो आणि त्यानंतर आपण बाईक, कार कि वॉकिंग त्याठिकाणी जाणार आहोत, ते सिलेक्ट करतो. यामुळे गुगल आपल्याला त्याप्रमाणे रस्ता दाखवतं. म्हणजे टू व्हिलरने जाण्यासाठी आणि कारने जाण्यासाठी सेम ठिकाणी वेगवेगळा टाईम कधीकधी रस्ताही वेगवेगळा दाखवतो. हे खास गुगलचं फीचर फारच उपयोगी आहे.

वाचा: UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.