Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘…तर तुमची पोलखोल करणार’; चंद्रकांत पाटलांचा पुन्हा शरद पवार यांना इशारा

9

हायलाइट्स:

  • ‘मराठा आरक्षणप्रश्नी केंद्राकडे बोट दाखवू नका’
  • ‘जन आशीर्वाद यात्रेमुळे अनेकांना शह बसणार’
  • चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापुरातून हल्लाबोल

कोल्हापूर :भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा (BJP Chandrakant Patil Criticizes NCP Sharad Pawar) साधला आहे. “जे करायचे नाही, त्याचे खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडण्यासाठीच शरद पवार हे मराठा आरक्षणाबाबत गावोगावी सभा घेणार आहेत, ‘पण या खोटं बोल पण रेटून बोल’ सभांची पोलखोल भारतीय जनता पक्ष करेल, त्यासाठी ते जिथे सभा घेतील, तेथे आम्ही सभा घेऊ,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

‘मराठा आरक्षण प्रश्नात ५० टक्के अटीचा अडथळा येणार आहे, आरक्षण देण्यात केंद्राची भूमिका अडचणीची ठरत आहे,’ असा आरोप करत शरद पवार यांनी गावोगावी जाऊन सभा घेत जनतेला वस्तुस्थिती सांगण्याची घोषणा केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत पाटील यांनी गावोगावी जाण्यापेक्षा मंत्रालयात एकत्र बैठक बोलवा, मग खरे कोण आणि खोटं कोण हे कळेल असा टोला मारला.

pawar gives answer to raj thackeray: ‘जातीयवादा’च्या आरोपानंतर शरद पवार यांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले…

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, पवारांनी केलेले विधान मती गुंग करणारे आहे. सत्याचा सामना करता येत नसेल तर गोंधळात टाकण्याची नीती वापरली जाते. मंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ पवारदेखील हीच नीती वापरत आहेत. ५० टक्के आरक्षणाची अट रद्द झाल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, असं ते सांगत आहेत. मग ५८ वर्षे केंद्रात व राज्यात तुमचीच सत्ता होती, तेव्हा ही अट रद्द का केली नाही, असा सवाल पाटील यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याची दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची इच्छाच नाही. जे करायचे नाही, त्याचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडायचे आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे प्रकरण अंगलट आल्यानेच पवार खोटं बोलण्यासाठी सभा घेणार आहेत. पण ते जिथे सभा घेतील, तिथे आम्ही सभा घेऊन त्यांचा पोलखोल करू, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

Shopping Mall Guidelines: मॉलमध्ये लहान मुलांना असा मिळणार प्रवेश!; राज्य सरकारचा सुधारित आदेश जारी

दरम्यान, ‘एकीकडे मागासवर्गीय समितीला निधी नाकारायचे, २०१८ च्या आर्थिक व सामाजिक जनगणनेकडे दुर्लक्ष करायचे आणि दुसरीकडे केंद्राकडे बोट दाखवत आपण हात वर करायचे ही भूमिका बदला असे आवाहन करून पाटील म्हणाले, मराठा आणि ओबीसी समाजाला सारे कळते. ते दूधखुळी नक्कीच नाहीत, असंही पाटील म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.