Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Samsung फोन्सवर तगडं डिस्काउंट, हजारो रुपये वाचवण्याची संधी, ऑफर फक्त १९ जूनपर्यंत

10

नवी दिल्ली :Amazon Samsung bonanza sale : तुम्ही जर सॅमसंग कंपनीचा नवीन फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फारच खास आहे. कारण ॲमेझॉनवर सॅमसंग बोनान्झा सेल मध्ये दमदार ऑफर्स सुरु असून या ऑफर्समध्ये सॅमसंग कंपनीचे फोन अगदी स्वस्तात मिळत आहे. हा सेल फक्त १९ जूनपर्यंतच असणार असून त्यापूर्वीच तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यावा लागेल. तर या सेलमध्ये फोन्सवर थेट सूट मिळत असून नो कॉस्ट EMI वर फोन्स घेण्याची खास ऑफरही मिळत आहे. चलातर या ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

Samsung Galaxy M04
४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या या फोनची मूळ किंमत ११,९९९ रुपये असून ॲमेझॉनवर यावर तब्बल ३९ टक्के सूट मिळत असून त्यानंतर हा फोन ७,२९९ रुपयांना उपलब्ध आहे. यावर बँक ऑफर्सही मिळवता येतील. तसंच या फोनवर एक्सचेंज ऑफर्सही आहेत. ज्यामुळे आणखी ६,९०० रुपये तुम्ही वाचवू शकता. पण यासाठी जुन्या फोनचं मॉडेल आणि कंडीशन चांगली असणं गरजेचं आहे. तसंच हा फोन नो कॉस्ट EMI वर दरमहा ३३० रुपयांपर्यंत विकत घेता येईल. यात १३ मेगापिक्सलचा ड्युअल रेअर कॅमेरा आणि मीडियाटेक P35 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M14 5G
सॅमसंगचा हा फोन मूळ १७,९९० इतक्या रुपयांचा असून या सेलमध्ये हा थेट १३,९९० रुपयांना मिळत आहे.याशिवाय आणखी ५०० रुपयांचं डिस्काउंटही यावर आहे. बँक ऑफर्समध्ये १७५० रुपयांपर्यंत आणखी पैसे वाचवता येणार आहेत. याचे फीचर्स म्हणाल तर ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असून ऑक्टॉ कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे.

Samsung Galaxy A34 5G
सॅमसंगचा हा पावरफुल १३ टक्के डिस्काउंटसह मिळत आहे.त्यामुळे ३५,४९९ रुपयांचा हा फोन थेट ३०,९९९ रुपयांना मिळत आहे. एक्सचेंज ऑफर्समध्ये आणखी २२,८०० रुपये वाचवता येतील. पण त्यासाठी जुन्या फोनची कंडीशन आणि मॉडेल दमदार असणं गरजेचं आहे. याशिवाय हा फोन १४८१ रुपयांच्या नो-कॉस्ट EMI वरही मिळणार आहे. याचे फीचर्स म्हणाल तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असून ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा

वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.