Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Ashadh 2023: आषाढ महिन्यात काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या खास महत्व आणि सण उत्सवांची यादी

8

हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्षाचा चौथा महिना म्हणजेच आषाढ महिना इंग्लिश कॅलेंडरच्या जून किंवा जुलै महिन्यात येतो. या वेळी भारतात भरपूर पाऊस पडत असल्याने हा पावसाळ्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो. खूप उष्णता सहन केल्यानंतर या महिन्यात आपल्याला थोडास दिलासा मिळतो. आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला “आषाढ” असे नाव पडले आहे. यंदा आषाढ महिना सोमवार, १९ जून २०२३ ला सुरु होणार असून तो सोमवार, १७ जुलै रोजी संपत आहे.

आषाढ महिन्यातील सण-उत्सव

सोमवार १९ जून कालिदास दिन, प.पू. टेंबेस्वामी पुण्यतिथी
बुधवार २१ जून दक्षिणायनारंभ तसेच आंतरराष्ट्रीय योग दिवस
गुरुवार २२ जून विनायक चतुर्थी
शनिवार २४ जून कुमारषष्ठी
गुरुवार २९ जून देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी
सोमवार ३ जूलै गुरुपौर्णिमा
गुरुवार ६ जुलै संकष्ट चतुर्थी
गुरुवार १३ जुलै कामिका एकादशी
रविवार १६ जुलै संत सावता माळी पुण्यतिथी
सोमवार १७ जुलै आषाढ दर्श अमावस्या, दीपपूजा

आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो. कारण या काळात अनेक मराठी सण येतात. या काळात देवशयनी आषाढी एकादशी येते. वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र असा काळ असतो. या महिन्यात देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रा घेतात, त्यामुळे पुढील चार महिने शुभ कार्य वर्ज्य आहेत. त्याला चातुर्मास असेही म्हणतात. आषाढ महिन्यात प्रभू जगन्नाथाची रथयात्रा निघते. त्यानंतर भगवान विष्णू हे पाच महिन्यांसाठी योग निद्रेला जाणार, अशी श्रद्धा आहे. त्यामुळं या महिन्यात काही बाबी करु नयेत, असे संकेत आहेत. तर काही बाबी केल्यास त्या लाभदायक ठरतात, अशी मान्यताही आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करु नये यावर एक नजर टाकूयात.

आषाढ महिन्यात काय करावे, काय करु नये?

आषाढात येणाऱ्या देवशयनी एकादशीनंतर शुभ कार्य करु नयेत. या दिवसापासून देव झोपी जातात असा समज आहे.
या महिन्यात शिळं अन्न खाऊ नये, तसंच जास्तीचं मसालेदार अन्नही सेवन करु नये, असं सांगण्यात येतं. या महिन्यात ब्रह्मचर्याचं पालन करावं, असंही सांगण्यात येतं.
आषाढ महिन्यात पाणी वाया घालवू नये. शास्त्रामध्ये याला शुभ संकेत मानण्यात येत नाही.
आषाढ महिन्यात विष्णूची उपासना आणि नामस्मरण करणं चांगलं मानण्यात येतं.
आषाढ महिन्यात सूर्यदेवाची पूजा करावी, यानं सूर्य प्रसन्न होतो.
आषाढात लक्ष्मी नारायणाची पूजा केल्यानं पुण्यफळाची प्राप्ती होते. तसचं अपार धनलाभ होतो, असंही शास्त्र सांगतं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.