Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Adipurush Collection Day 4: प्रभास-क्रितीची जादू ओसरली! ‘आदिपुरुष’च्या हिंदी व्हर्जनच्या कमाईत २८ कोटींचा फटका

13

मुंबई: प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले असून या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहेत. १६ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमावरुन कधी यामधील संवाद तर कधी यातील पात्रांवर टीका होत आहे, तर अनेक ठिकाणी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. मात्र, या सगळ्यावर मात करत ‘रामायण’ची कथा मांडणाऱ्या ओम राऊत दिग्दर्शित चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग केली. मात्र नाही म्हटलं तरी चित्रपटावर सातत्याने होत असलेल्या टीकेचा थेट परिणाम बॉक्स ऑफिसवर होताना दिसला. चित्रपटाची चौथ्या दिवसाची कमाई म्हणजेच पहिल्या सोमवारचे कलेक्शनही समोर आले.

चित्रपटांच्या कमाईची आकडेवारी सांगणाऱ्या Sacnilk या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, Adipurush ने पहिल्या तीन दिवसात २२१.१ कोटींची कमाई केली, आता चौथ्या दिवसाचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. संध्याकाळपर्यंत हा आकडा काहीसा वाढू शकतो. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच सोमवारी चित्रपटाने सर्व भाषांमध्ये एकूण मिळून फक्त २० कोटींची कमाई केली आहे. यापैकी हिंदीची कमाई १० कोटी आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने या कमाईत झालेल्या घसरणीकडे दुर्लक्ष करता येऊ शकते, मात्र या एकूण आकडेवारी पाहिल्यास खूपच वेगाने सिनेमाची कमाई घसरते आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर आणि शिवसेनेचं आहे खास नात; म्हणाला- ‘माझे बाबा १९९९ पर्यंत…’
चौथ्या दिवशी ‘आदिपुरुष’च्या हिंदी व्हर्जनची कमाई १८ कोटींनी घटली

५०० कोटींहून अधिकचे बजेट असणाऱ्या या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या तीन दिवसात दररोज साधारण ३७ ते ३८ कोटी रुपये कमावले होते. अर्थात पहिल्या तीन दिवसात फारशी घसरण झाली नाही, मात्र चौथ्या दिवशी अचानक मोठी तफावत दिसून आली. तिसऱ्या दिवशी या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने ३८ कोटींची कमाई केली होती, या कमाईत चौथ्या दिवशी २८ कोटींची घट झाली. चौथ्या दिवशी या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने केवळ १० कोटी कमावले आहेत. या कमाईनंतर चार दिवसांत या सिनेमाची कमाई २४१ कोटी झाली आहे. Sacnilk ने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने तीन दिवसात सुमारे ३०२ कोटी रुपयांचे वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे.

लग्नानंतर ११ वर्षांनी राम चरण-उपासना यांच्या घरी आली ‘लक्ष्मी’; सुपरस्टार चिरंजीवी बनले आजोबा
तेलुगूमध्ये ‘आदिपुरुष’ची कमाई घसरली

केवळ हिंदीतच नाही, तर सर्व भाषांमधील कमाईत घसरण वेगाने झाली आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाने पहिल्या दिवशी हिंदीत ३७.२५ कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी ३८ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ३८ कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी १० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. तेलगू भाषेत तर चित्रपटाच्या कमाईमध्ये ही घसरण ही घसरण दुसऱ्या दिवसापासून नोंदवली जाते. प्रभासचा मोठा चाहतावर्ग असूनही ही घसरण पाहायला मिळाली. तेलगूमध्ये ‘आदिपुरुष’ने पहिल्या दिवशी हिंदीपेक्षा जास्त कमाई अर्थात ४८ कोटी रुपये कमावले होते. मात्र दुसऱ्या दिवशी हा आकडा थेट २६.६५ कोटींवर घसरला. वीकेंडला रविवारी त्यात थोडी वाढ झाली आणि ती कमाई २९.३ कोटींच्या जवळ पोहोचली होती.

‘आदिपुरुष’चा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहून काय म्हणाले प्रेक्षक?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.