Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Vi Recharge : वोडाफोन आयडियानं आणला खास रिचार्ज, ५० जीबी डेटा मिळणार फ्री, आजच करा रिचार्ज

10

नवी दिल्ली :Vi Special Recharge : भारतात आता बरेचजण 5G नेटवर्क वापरु लागले आहेत. Jio आणि Bharti Airtel सारख्या कंपन्या देशभरात 5जी नेटवर्कवर काम करत आहेत. २०२३ च्या अखेरीस भारतातील बहतांश शहरांपर्यंत ५जी नेटवर्क व्याप्ती वाढवण्याचे दोन्ही कंपन्यांचे उद्दिष्ट आहे. पण तिसरी आघाडीची टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea चे ग्राहक अजूनही 5G सेवांच्या घोषणेची वाट पाहत आहेत. त्यामुळे वोडाफोन आयडियाने आपला घसरलेला यूजरबेस सुधारण्यासाठी काही नवीन योजना आणल्या आहेत.यात एक खास ऑफर कंपनीने आणली असून या ऑफरमध्ये ५० जीबी अधिक डेटा युजर्सना मिळणार आहे. पण ही ऑफर फक्त २८ जूनपर्यंतच वॅलिड असून चलातर या रिचार्जबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

३०९९ रुपयांचा प्लान
हा कंपनीचा ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लान आहे. ज्यामध्ये युजर्सना दररोजसाठी २ जीबी डेटा कंपनी देत आहे. तसंच विशेष म्हणजे कंपनी ५० जीबी अधिकचा डेटा युजर्सना याद्वारे देत आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दरदिवसाला १०० मोफत एसएमएस मिळत आहेत.तसंच वोडाफोन-आयडियाचा बिंज ऑल नाईट बेनिफिटही आहेत. ज्यामुळे रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे. अधिकचा फायदा म्हणाल तर डिज्नी प्लस हॉटस्टारचचं मोफत सब्सक्रिप्शन एक वर्षासाठी या प्लानमध्ये आहे. Vi Movies & TV अॅपचं सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.
वाचा : Smartphone Camera Care : मोबाईलचा कॅमेरा साफ करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर कॅमेराच होईल खराब
१४४९ रुपयांचा प्लान
हा कंपनीचा प्लान १८० दिवसांच्या वैधतेसह येत आहे. यामध्ये तुम्हाला १.५ जीबी डेली डेटा मिळत आहे. ऑफरमध्ये कंपनी ३० जीबी अधिकचा डेटा ही मिळणार आहे. तसंच अनलिमिटेड कॉलिंग आणि दरदिवसाला १०० मोफत एसएमएस मिळत आहेत. याशिवाय Vi Movies & TV अॅपचं सब्सक्रिप्शनही मिळणार आहे. तसंच वोडाफोन-आयडियाचा बिंज ऑल नाईट बेनिफिटही आहेत.

वाचा : समोरचा आपला कॉल रेकॉर्ड करतोय का? जाणून घेण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.