Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Budget Smart TV : फक्त १०,९९९ रुपयांत मिळेल ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही, ‘हे’ दोन आहेत बेस्ट ऑप्शन

9

नवी दिल्ली : Budget 43 inch TV : आता जर मोठा स्मार्टटीव्ही विकत घ्यायचा आहे तर मोठी रक्कम मोजण्याची गरज नाही. कारण आजकाल नवनवीन ब्रँड्सचे कितीतरी स्मार्टटीव्ही बाजारात येत आहेत. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास बजेट टीव्हीबद्दल सांगणार आहोत. जे ४३ इंचाचे असून त्यांची किंमत ११ हजारांपेक्षाही कमी आहे. या टीव्हींमध्ये 30W चा दमदार साऊंड मिळतो. म्हणजेच तुम्हाला हा टीव्ही घेतल्यावर साऊंडबार विकत घेण्याची गरजच नाही. त्यामुळे तुम्हालाही जर एखादा मोठा भारी स्मार्टटीव्ही तो देखील बजेटमध्ये घ्यायचा असल्यास दोन खास ऑप्शन्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांची किंमत कमी आणि फीचर्स दमदार आहेत.

Westinghouse 43 inches FHD Smart TV
अॅमेझॉनवर हा दमदार टीव्ही २०,९९९ रुपयांना लिस्टेड केला गेला आहे.पण तुम्हाला विकत घेण्यासाठी इतके पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला या टीव्हीवर बऱ्याच ऑफर्स मिळत आहेत. हा टीव्ही तुम्हाला तब्बल २९ टक्के डिस्काउंटनंतर ६००० रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटने मिळणार आहे. ज्यानंतर त्याची किंमत १४,९९९ रुपये होईल. मग टीव्हीवर २५०० रुपयांचा एक्सचेंज बोनसही मिळत आहे. बँक ऑफर्सच्या मदतीनं आणखी १५०० रुपये वाचू शकतात. अशारितीने हा टीव्ही अगदी १०,९९९ रुपयांपर्यंत विकत घेता येईल. याचे फीचर्स म्हणाल तर ४३ इंचाचा फुल एचजी डिस्प्ले आहे. ज्याचं रेझ्यूलेशन 1920×1080 पिक्सल आहे. हा 60Hz रिफ्रेश रेटसह येत असून हा क्लिअर ऑडिओसाठी 30W इतका आहे.

Foxsky 43 inches FHD Smart TV
या टीव्हीला अॅमेझॉनवर ४१,४९९ रुपयांच्या मूळ किंमतीसह लिस्ट करण्यात आलं आहे.पण यावर तब्बल ६४ टक्के सूट मिळत असल्याने याची किंमत १४,९९९ रुपये होईल. तसंच या टीव्हीवर २५०० रुपयांचा एक्सचेंज बोनसही मिळत आहे. बँक ऑफर्सच्या मदतीनं आणखी १५०० रुपये वाचू शकतात. ज्यानंतर हा टीव्ही अगदी १०,९९९ रुपयांपर्यंत विकत घेता येईल. या टीव्हीचे फीचर म्हणाल तर ४३ इंचाचा हा स्मार्ट टीव्ही 1920×1080 पिक्सल रेझ्यूलेशनसोबत येतो. याची साऊंड क्वॉलिटीही जबरदस्त आहे.

वाचा : आता CT Scan, MRI, Xray करायची गरज नाही, फक्त डोळे स्कॅन करुन कळणार तुम्हाला कोणता आजार?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.