Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

100 मेगापिक्सल कॅमेरा, 256 जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत

10

चायनीज ब्रँड ऑनर ने यूरोप मध्ये आपला नवीन फोन Honor 90 Lite Pro ला लाँच केले आहे. ऑनरने भारतात लवकरच पुनरागमन करणार आहे. Honor 90 Lite Pro ला मीडियाटेक Dimensity 6020 प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज सोबत येतो. Honor 90 Lite Pro मध्ये ६.७ इंचाचा LTPS LCD डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये अँड्रॉयड १३ दिले आहे.

फोनची किंमत
Honor 90 Lite च्या ८ जीबी रॅम सोबत २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २४९.९९ यूरो म्हणजेच जवळपास २६ हजार २१० रुपये आहे. या फोनला ब्रिटनमध्ये कंपनीच्या साइटवर उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनला मिडनाइट ब्लॅक, टायटेनियम सिल्वर आणि सियान लेक या कलर मध्ये खरेदी करू शकता.

वाचाः फक्त १४९९ रुपयात खरेदी करा स्मार्ट टीव्ही, फ्लिपकार्ट देत आहे शानदार ऑफर

Honor 90 Lite ची स्पेसिफिकेशन
Honor 90 Lite मध्ये अँड्रॉयड 13 सोबत MagicOS 7.1 दिले आहे. याशिवाय, या फोनमध्ये ड्युअल सिम सोबत ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस LTPS LCD डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये रिफ्रेश रेट 90Hz दिले आहे. यात मीडियाटेक Dimensity 6020 प्रोसेसर दिले आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज दिले आहे.

वाचाः iphone 15 series मध्ये दिसणार हे ३ मोठे बदल, पाहा डिटेल्स

Honor 90 Lite Pro मध्ये तीन कॅमेरे दिले आहे. ज्यात प्रायमरी लेन्स १०० मेगापिक्सलचा डेप्थ आणि तिसरा लेन्स २ मेगापिक्सलचा मायक्रो आहे. कॅमेरा सोबत 10x डिजिटल झूम दिले आहे. या फोनच्या फ्रंट मध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 5G, 4G, डुअल बँड Wi-Fi, ब्लूटूथ 5.3, NFC, GPS, OTG आणि USB Type-C पोर्ट दिले आहे. या फोनमध्ये 3.5mm चा हेडफोन जॅक आणि 4500mAh च्या बॅटरी सोबत 35W चा चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे.

वाचाः जपानचेही भारताच्या पावलावर पाऊल, गुगल आणि ॲपलचे वाढवले टेन्शन

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.