Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजपासून Xiaomi Pad 6 चा सेल सुरु, २५६ जीबी स्टोरेजसह आणखीही बरच काही, ६ हजारांपर्यंत सूट

9

नवी दिल्ली : Xiaomi Pad 6 Sale Online : Xiaomi ने अलीकडेच Xiaomi Pad 6 टॅबलेट भारतात लाँच केला आहे. Xiaomi Pad 6 ची विक्री आजपासून (२१ जून २०२३) सुरू झाली आहे. दरम्यान Xiaomi च्या या लेटेस्ट टॅबलेटमध्ये ११ इंचाचा LCD डिस्प्ले, 8840mAh बॅटरी आणि क्वाड स्पीकर सेटअप सारखी खास फीचर्स आहेत. तर या लेटेस्ट Xiaomi Pad 6 ची किंमत, फीचर्स आणि ऑफर्सबद्दल जाणून घेऊ…Xiaomi Pad 6 ची भारतात किंमत आणि खास ऑफर
Xiaomi Pad 6 च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत २६,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मॉडेल २८,९९९ रुपयांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे. दरम्यान लाँच ऑफरचा एक भाग म्हणून, Xiaomi ICICI बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांद्वारे टॅब्लेटच्या खरेदीवर तब्बल ३ हजारांची सूट देत आहे. तसच लाँच ऑफर अंतर्गत, एक्सचेंजमध्येही ३ हजार रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. अशारितीने ६ हजारापर्यंत थेट सूट मिळवता येऊ शकते. तर या Xiaomi Pad 6 सोबत Xiaomi Pad 6 Keyboard Case ४,९९९ रुपयांमध्ये घेता येईल. तसंच टॅबलेटसाठी फोलिओ केस १,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. आजपासून हा टॅब Mi Store आणि Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Xiaomi Pad 6 चे फीचर्स
Xiaomi Pad 6 मध्ये Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 650 GPU उपलब्ध आहे. यामध्ये ६ जीबी आणि ८ जीबी रॅमसह १२८ आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज पर्यायही आहेत. Xiaomi च्या या टॅबलेटमध्ये Android 13 आधारित MIUI 14 उपलब्ध आहे. Xiaomi Pad 6 मध्ये ११ इंचाचा डिस्प्ले आहे जो 2880 × 1800 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. Xiaomi Pad 6 चा रिफ्रेश रेट 144 Hz आहे. यात १३ मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, 8840mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्याला 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

वाचा : आता CT Scan, MRI, Xray करायची गरज नाही, फक्त डोळे स्कॅन करुन कळणार तुम्हाला कोणता आजार?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.