Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Budget Smartphones: २० हजारांपेक्षा कमी आहे बजेट? ‘हे’ आहेत एकदम बेस्ट ऑप्शन्स, फीचर्स एकदा पाहाच

21

Redmi Note 12

Xiaomi चा Redmi Note 12 एक भारी डिझाईनसह येणारा फोन असून त्याची किंमत १६,९९९ रुपये इतकी आहे. परफॉर्मन्सपासून ते बॅटरी आणि डिस्प्लेपर्यंत सर्वातच हा फोन भारी आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह याचा डिस्प्ले फुल एचडी प्लस रेझोल्यूशनसह येतो. फोनमध्ये 48MP प्राथमिक सेन्सरसह 8MP अल्ट्रावाइड, 2MP मॅक्रो सेन्सर कॅमेरा आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 5000mAh बॅटरीच्या वर 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
वाचा : Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर

iQOO Z7

iqoo-z7

फोनमध्ये चांगल्या कामगिरीसाठी MediaTek Dimensity 920 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामुळे फोन मल्टीटास्किंगपासून गेमिंगपर्यंत सर्वात भारी आहे. फोनमध्ये ६.३८ इंचाचा 90Hz AMOLED डिस्प्ले आहे. यात 5000mAh बॅटरीसह 44W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान आहे. त्याच्या कॅमेरा सेटअपमध्ये 64MP रेअर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन १८,९९९ रुपये किमतीत उपलब्ध आहे.

​वाचाः Phone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Moto G73

moto-g73

हा मोटोरोला G73 १८,९९९ रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. यात ६.५ इंचाचा LCD डिस्प्ले आणि 120Hz चा रिफ्रेश रेट आहे. डिव्हाइसला 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे. प्रोसेसिंग पॉवरच्या बाबतीत, फोनला MediaTek Dimensity 920 SoC आणि 8GB पर्यंत RAM देण्यात आला आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेऱ्याह 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे.

वाचा : SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन

​Realme 10 Pro 5G

realme-10-pro-5g

एलसीडी पॅनेलसह येणाऱ्या या फोनचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात 2MP डेप्थ शूटरसह 108MP प्राथमिक कॅमेरा आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 SoC सह 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आहे. तसेच, फोनमध्ये 5000mAh बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. डिव्हाइसची किंमत म्हणाल तर १८,९९९ रुपये आहे.
​वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

​OnePlus Nord CE 3 Lite 5G

oneplus-nord-ce-3-lite-5g

वनप्लसचा हा फोन १९,९९९ रुपयांना असून यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695G 5G प्रोसेसर आहे. तसंच ६.७ इंच फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आहे. कॅमेरा सेटअपच्या बाबतीत, यात 2MP मॅक्रो लेन्ससह 108MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. यासोबतच, या फोनला 5,000mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.