Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मोदी-बायडेनमध्ये होणार AI संबधित खास डिल, सर्वाधिक पेंटेंट असलेल्या चीनला मागे टाकण्यासाठी भारत सज्ज
AI जगतात चीन आघाडीवर
चीनला आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आघाडीवर राहायचे आहे. हेच कारण आहे की चीनने सर्वाधिक एआय पेटंट दाखल केले आहेत, जे अमेरिकेसह भारतासाठीही चिंतेचा विषय आहेत. चीनी कंपनी Tencent ने तब्बल ९,६१४ AI पेटेंट दाखल केले आहेत. तर Baidu कंपनी ९,५०४ पेटंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच ६,४१० पेटेंट चिनी कंपनी पिंग एनने दाखल केले आहेत. दरम्यान या सर्वामुळे सध्यातरी AI जगतात चीन आघाडीवर आहे.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
सर्व देश चीनच्या मागेच
चीनच्या तुलनेत इतर देशांची तुलना केली तर सद्यातरी ते खूप मागे पडलेले दिसत आहेत. या यादीत दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग पाचव्या स्थानावर आहे. तर मायक्रोसॉफ्ट सहाव्या आणि अल्फाबेट सातव्या क्रमांकावर आहे. भारत सध्यातरी चीनच्या बराच मागे असून त्यासाठी अमेरिकेसोबतच्या या डिलची मोठी चर्चा आहे.
वाचा : SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन
कोणत्या कंपन्यांकडे किती पेटेंट?
Tencent – ९,६१४
Baidu – ९,५०४
IBM – ७,४४३
सॅमसंग – ६,८८५
पिंग एन – ६,४१०
मायक्रोसॉफ्ट – ५,८२१
वर्णमाला – ४,०६८
वाचाः Phone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
मोठी डिल होण्याची शक्यता
अमेरिकन कंपनी openAI सध्या AI च्या जगात खूप पुढे आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ChatGPT लाँच केले आहे, ज्याची खूप चर्चा आहे. त्याचप्रमाणे आणखी एक अमेरिकन कंपनी गुगलनेही एआय टूल बार्ड लाँच केले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन कंपन्या भारताला AI क्षेत्रात मोठी मदत करू शकतात. पीएम मोदींना अमेरिकन टेक कंपन्यांच्या सीईओंनाही भेटायचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने, भारत आणि अमेरिका कृत्रिम बुद्धिमत्तेसह तसेच सेमीकंडक्टरच्या बाबतीत चीनच्या विरोधात वेगाने पुढे जाऊ शकतात. त्यामुळे एक मोठी डिल होण्याची शक्यता आहे.
वाचा : Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर
AI का आहे महत्वाचे?
सद्यस्थितीला आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI फारच महत्त्वाचं आहे. सध्याच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर लष्करात होऊ शकतो. त्यामुळे सर्वच देशांना AI मध्ये प्रगती करायची असून भारत आणि अमेरिकेला एकत्र येऊन चीनला मागेट टाकायचे आहे.
वाचा : Budget Smartphones: २० हजारांपेक्षा कमी आहे बजेट? ‘हे’ आहेत एकदम बेस्ट ऑप्शन्स, फीचर्स एकदा पाहाच