Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

itel कंपनीने फक्त १,४९९ रुपयांना लाँच केला खास फोन, UPI पेमेंट करण्याचाही आहे ऑप्शन

9

नवी दिल्ली :itel ही स्मार्टफोन तसंच इतरही इलेक्ट्रॉनिक बजेटमध्ये बनवणारी कंपनी आहे. ज्यांचे प्रोडक्ट्स हे खासकरुन कमी किंमतीत उपलब्ध केले जातात जेणेकरुन ते सर्वांना परवडतील. दरम्यान आताही या कंपनीने भारतीय बाजारपेठेतील UPI ची वाढती मागणी लक्षात घेऊन आपले खास फीचर फोन लाँच केले आहेत, ज्यामध्ये UPI ला सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजेचया फीचर फोनवरून तुम्ही UPI पेमेंट देखील करू शकाल. आयटेलची ही सुपर गुरू सीरिज लाँच झाली असून यातंर्गत तीन फीचर फोन सादर करण्यात आले आहेत. ज्या तिन्ही फोन्सची किंमत २ हजारांच्या आत आहे. यात सुपर गुरू २००, सुपर गुरू ४०० आणि सुपर गुरू ६०० या फोन्सचा समावेश आहे.

तर itel Super Guru Series सह QR कोड स्कॅनर प्रदान करण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही UPI पेमेंट करू शकाल. त्यापैकी itel Super Guru 400 ची किंमत १,६९९ रुपये ठेवण्यात आली आहे. त्याची बॉडी अल्ट्रा स्लिम मेटल अशी आहे. फोनमध्ये २.४ इंचाचा डिस्प्ले आहे. याशिवाय, यात 1200mAh बॅटरी आहे, जी १४ दिवसांचा बॅकअप देईल.

वाचा :Smartphone Camera Care : मोबाईलचा कॅमेरा साफ करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर कॅमेराच होईल खराब

याशिवाय itel Super Guru 200 ची किंमत १,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. यात 1200mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जी तब्बल २१ दिवसांचा स्टँडबाय टाइम देते. हा फोन मेटल फिनिशसह देखील येतो. यात 1.3MP कॅमेरा आणि १.८ इंचाचा डिस्प्ले आहे. तसंच itel Super Guru 600 ही या यादीत असून याची किंमत १,८९९ रुपये आहे. यात २.८ इंचाचा डिस्प्ले आणि मेटल बॉडी आहे. फोनमध्ये 1900mAh बॅटरी आहे जी २० दिवसांचा स्टँडबाय टाइम देत असल्याचा कंपनी दावा करते. यातही 1.3MP कॅमेरा देखील आहे. तिन्ही फोनसह, कंपनीने फ्रीमध्ये कव्हर्स देखील देत असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय फोनमध्ये काही समस्या असल्यास तक्रार केल्यानंतर २४ तासांच्या आत समस्या दूर केली जाईल, असा दावा कंपनीने केला आहे.

वाचा : समोरचा आपला कॉल रेकॉर्ड करतोय का? जाणून घेण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.