Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Apple कंपनीनं आणला भन्नाट सेल, ॲपल पेन्सिल, एअरपॉड्स मोफत मिळवण्याची संधी

11

नवी दिल्ली : Apple Back to University Sale : जगातील सर्वात आघाडीची टेक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲपलचे सर्वच प्रोडक्ट्स अगदी हटके असतात. किंमतीत काहीसे महाग असले तरी त्याची गुणवत्ता तितकीच भारी असते. दरम्यान तुम्हालाही तुमच्या घरात ॲपलचे प्रोडक्ट्स आणायचे असतील तर कंपनीने एक खास अशा ‘बॅक टू युनिव्हर्सिटी सेल’ आणला आहे. या सेलमध्ये Mac, iPad सारखे प्रोडक्ट्स स्वस्त मिळतच असून Apple Airpods, Apple Pencil फ्री मध्ये मिळवण्याची देखील संधी आहे. तर नेमका हा सेल काय आहे जाणून घेऊ…

तर या युनिव्हर्सिटी सेलमध्ये खासकरुन कॉलेज-युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी भारी-भारी डिल्स आहेत. या सेलचा फायदा सर्व ॲपलच्या रिसेलर्ससह नुकत्याच खोललेल्या मुंबई येथील बीकेसी आणि दिल्लीच्या साकेतमधील ॲपल स्टोअरमध्ये देखील घेता येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यासांठी असलेल्या या खास सेलमध्ये विद्यार्थ्यांना आपलं कॉलेज आयडी कार्ड दाखवणं अनिवार्य आहे. त्याच्या वेरिफेकशननंतरच या सेलचा फायदा विद्यार्थ्यांना होईल.
या सेलमधील काही खास डिल्स पुढीलप्रमाणे-

  • Mac आणि iPad स्वस्तात विकत घेण्याची संधी
  • काही ठरावीक Mac सोबत एअरपॉड्स फ्री
  • तसंच काही ठरावीक iPad सोबत Apple पेन्सिल फअरी
  • AppleCare + च्या सब्सक्रिप्शनवर २० टक्के सूट
  • ३ महिन्यांसाठी Apple Music, Apple TV चं सब्सक्रिप्शन मोफत

वाचा : समोरचा आपला कॉल रेकॉर्ड करतोय का? जाणून घेण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो?
कोणत्या मॉडेल्सवर मिळत आहे डिस्काउंट?
या सेलमध्ये MacBook Air, MacBook Pro, iMac 24 + Airpods 3rd Gen, Mac mini+, Airpods 2nd Gen, iPad Pro 11 inch ECf 12.9 inch iPad Air 5th Gen, Apple Pencil 2nd Gen या सर्व प्रोडक्ट्सवर खास ऑफर असून शिक्षकांना देखील ८ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

वाचा :Smartphone Camera Care : मोबाईलचा कॅमेरा साफ करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर कॅमेराच होईल खराब

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.