Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jobs Opening at RBI : भारतीय रिझर्व बँकेत नोकरी संधी जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आणि निकष

11

एकीकडे स्पर्धा वाढत असताना आता तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँकेत काम करण्याची संधी मिळाली तर….
होय हे खरं आहे. RBI ने नुकत्याच त्यांच्या मुंबईतील विविध ठिकाणच्या कार्यालय आणि बँकांमधील कामासाठी तब्बल ६६ जागांसाठी भरती सुरु केली आहे.

आरबीआयच्या या भरतीअंतर्गत डेटा वैज्ञानिक, डेटा अभियंता, आयटी सुरक्षा तज्ञ, आयटी सिस्टम प्रशासक, आयटी प्रकल्प प्रशासक, नेटवर्क प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक, वरिष्ठ विश्लेषक, विश्लेषक आणि सल्लागार अशा विविध पदाच्या जागांसाठी या भरतीदरम्यान नियुक्ती केली जाणार आहे. या सर्व जागा कराराच्या आधारावर भरण्यात येणार आहेत.

(वाचा : Diploma Admission : डिप्लोमा प्रवेश अर्जांना मुदतवाढ, विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत अर्ज भरता येणार )

२१ जून २०२३ पासून सुरु करण्यात आलेले हे अर्ज तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर येत्या ११ जुलैपर्यंत ऑनलाइन स्वरुपात सबमिट करायचे आहेत. या भरतीसाठी आवश्यक ती सगळी माहिती खाली दिली आहे.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अधिकृत वेबसाईट :

https://www.rbi.org.in/

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा :

या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा स्वतंत्रपणे विहित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

(वाचा : शिक्षण आणखी सोपं होणार; देशात २०० नवे शैक्षणिक चॅनेल, पुण्यात शैक्षणिक कुंभ )

या पदांसाठी केली जाणार भरती :

डेटा वैज्ञानिक (Data Scientist) , डेटा अभियंता (Data Engineer), आयटी सुरक्षा तज्ञ (IT Security Expert), आयटी सिस्टम प्रशासक (IT System Administrator), आयटी प्रकल्प प्रशासक (IT Project Administrator), नेटवर्क प्रशासक (Network Administrator), अर्थशास्त्रज्ञ (Economist), डेटा विश्लेषक (Data Analyst), वरिष्ठ विश्लेषक (Sr. Data Analyst), विश्लेषक (Analyst) , सल्लागार (Consultant).

महत्त्वाचे :

  • आरबीआयच्या या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज https://www.rbi.org.in/ या वेबसाइटद्वारे भरता येणार आहेत.
  • २१ जूनपासून सुरु झालेल्या या प्रक्रियेची ११ जुलै ही नोंदणी करण्याची अंतिम तारीख असणारं आहे.

अशी करा नोंदणी :

  • Reserve Bank of India च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर, Click Here for New Registration वर क्लिक करा
  • तुमचे नाव, ईमेल आणि इतर आवश्यक माहिती भरून रजिस्टर करा.
  • ऑनलाइन शुल्क भरून तुमचा अर्ज सबमिट करा.
  • तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळून तो सांभाळून ठेवा.
  • पुढील कार्यवाही करण्यासाठी हाच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगइन करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.