Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

WhatsApp चं अनोळखी कॉल थेट सायलेंट करण्याचं फीचर झालं लाँच, नेमका फायदा, कसं वापराल? सर्व माहिती एका क्लिकवर

13

​आंतरराष्ट्रीय कॉल स्कॅममुळे आलं हे फीचर

अनोळखी नंबर आपोआप सायलेंट होणार हे फीचर व्हॉट्सॲप लवकरच जागतिक स्तरावर आणत आहे परंतु याचा अधिक वापर भारतात होऊ शकतो. कारण मागील काही काळापासून देशानत वापरकर्त्यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून स्कॅम कॉल येत असल्याच्या घटना खूप वाढल्या आहेत. अनेकांनी हे कॉल उचलले आणि नंतर त्यांची दिशाभूल झाली आणि अखेरीस, त्यांच्यातील काहींना आर्थिक नुकसानी झाले. या सर्वामुळेच हे फीचर आणले गेले आहे.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

​काय आहे या फीचरचा फायदा?​

​काय आहे या फीचरचा फायदा?​

तर अनोळखी कॉलर्सना थेट सायलेंट करण्यासाठीचे हे WhatsApp फीचर वापरकर्त्यांना अधिक प्रायव्हसी, सुरक्षा आणि इनकमिंग कॉल्सवर नियंत्रण देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. WhatsApp आधीच एक सिक्योर असं सोशल मीडिया अॅप असूनही अधिकच्या संरक्षणासाठी हे फीचर देण्यात आळं आहे. ज्यामुळे आता स्पॅम करणारे, स्कॅमर्स आणि अज्ञात लोकांचे कॉल थेट सायलेंट होणार आहेत.

वाचा : Jio आणत आहे सर्वात स्वस्त 5G फोन, कधी होणार लाँच? काय असेल किंमत?

कसं काम करतं हे फीचर?

कसं काम करतं हे फीचर?

एकदा हे फीचर फोनमध्ये एनाबेल केलं की, सायलेन्स अननोन कॉलर फीचर युजर्सना त्यांच्या फोनमध्ये सेव्ह नसलेल्या नंबरवरील कॉल आपोआप सायलेंट करायला मदत करेल, थेट हे फोन सायलेंट होणार आहेत. दरम्यान हे कॉल फोनवर वाजणार नसले तरी मिस्ड कॉलच्या स्वरुपात या फोनची सूचना कॉल लिस्टमध्ये दिसेल, जर ते कोणीतरी महत्त्वाचे असेल तर वापरकर्ते रिटर्न कॉलही करु शकतात.

वाचाः Phone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

​व्हॉट्सॲपवर प्रायव्हसी चेकअप फीचरही येणार

​व्हॉट्सॲपवर प्रायव्हसी चेकअप फीचरही येणार

व्हॉट्सॲप लवकरच प्रायव्हसी चेकअप फीचर देखील आणणार आहे. हे फीचर वापरकर्त्यांना अॅपवरील त्यांची सिक्योरिटी तसेच वेगवेगळे सिक्योरिटी संबधित पर्याय याबद्दल जाणून घेण्यास देखील मदत करेल. या फीचरमुळे नेमकी कशाप्रकारची सिक्योरिटी वापरकर्त्यांना हवी आहे हे युजर्सना स्वत: निवडता येणार आहे.

वाचा : Aadhar Card संबधित फ्रॉडपासून वाचण्यासाठी घरबसल्या करा ‘हे’ काम, सोप्या आहेत स्टेप्स

​कशी चेक कराल तुमची प्रायव्हसी सेटिंग?

​कशी चेक कराल तुमची प्रायव्हसी सेटिंग?

तर युजर्सना व्हॉट्सअॅपवर आपली प्रायव्हसी चेक करण्यासाठी आधी “सेटिंग्ज” वर जा्ऊन मग प्रायव्हसी ऑप्शनवर टॅप करावे लागेल. त्याठिकाणी तुम्हाला तुमची प्रायव्हसी सेटिंग तपासण्याचा पर्याय मिळेल. तिथे “चेकअप सुरू करा” वर टॅप करता मेसेज, कॉल आणि खाजगी माहितीची सुरक्षा मजबूत करण्यासाठी बरेच प्रायव्हसी पर्याय येतील त्यातून तुम्हाला निवडता येणार आहे.

वाचा: सिम पोर्ट कसं कराल?, नंबर न बदलता कंपनी होणार चेंज, या ठिकाणी पाहा सोपी ट्रिक

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.