Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

FYJC Admission : अकरावी प्रवेशाचे बिगुल! प्रकियेबाबत असेल संभ्रम तर पालकांनी हे वाचाच

18

महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीरझाला आणि पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी सगळ्यांची गडबड सुरु झाली. प्रवेश प्रक्रियेच्यावेळी आवश्यक असणारी कागदपत्र नसल्यामुळे आणि काही कारणामुळे ही कागदपत्रे मिळायला वेळ लागत असल्यामुळे शिक्षण विभाग आणि सरकारच्या वतीने विद्यार्थी हिताला महत्त्व देत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तर, अकरावी प्रवेश प्रक्रीयेवेळी विद्यार्थ्यांमध्ये अजूनही काहीप्रमाणात संभ्रम असल्यामुळे FYJC प्रवेशाचा हा गाईड खास विद्यार्थी आणि पालकांसाठी…

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा :

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र सादर करण्यास शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे. अकरावीची पहिली यादी जाहीरहोऊन आता प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना अडचणी येत आहेत. त्यावर निर्णय घेत सरकारने नॉन क्रिमिलेअर पूर्ततेबाबत मुदतवाढ दिली आहे.

इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचे लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमान्पाताराची आवश्यकता असते. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडे हे प्रमाणपत्र असणे गरजेचे असते. मात्र, काही कारणांमुळे हे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यामुळे अकरावी प्रवेशापासून अनेक विद्यार्थी वंचित राहण्याची भीती होती.

यावर तोडगा म्हणून, विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र धान्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोहचपावती घेऊन प्रवेश देण्यात यावा असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कॉलेजमध्ये जमा करायचे आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचे :

  • विद्यार्थ्याला मिळालेल्या (अॅलॉट झालेल्या) कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला जाण्याअगोदर आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच प्रोसीड फॉर अॅडमिशन या पर्यायावर क्लिक करून सदर अर्जाची अर्जाची प्रत (प्रिंट) विद्यार्थ्यांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याने पसंती अर्जात नमूद केलेल्या क्रमवारीपैकी पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले असल्यास दिलेल्या वेळेत प्रवेश घेणे अनिवार्य असेल. अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास असे विद्यार्थी चौथ्या प्रवेश फेरीपर्यंत प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर राहतील.
  • परंतु, पहिल्या पसंतीव्यतिरिक्त कुठल्याही पसंतीचे कॉलेज मिळाले असल्यास विचार करून प्रवेश घ्यावा, कारण प्रवेश घेतला तर चौथ्या फेरीपर्यंत घेतलेला प्रवेश रद्द करून दुसऱ्या कॉलेजमध्ये जाता येणार नाही, हे विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
  • प्रत्येक फेरीनंतर आपल्या प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची आणि पसंती क्रमात बदल अथवा फेरफार करण्याची मुभा विद्यार्थ्याला आहे.
  • प्रवेश अर्जाच्या भाग १ मध्ये दुरुस्ती करायची असल्यास शाळेत किंवा मार्गदर्शन केंद्रावर जावे लागेल. भाग २मध्ये दुरुस्ती करायची असल्यास (शाखा किंवा कॉलेज किंवा दोन्ही) आपण स्वतःच प्रवेश अर्ज भाग २ अनलॉक करून दुरुस्तीनंतर पुन्हा लॉक केला असल्याची खात्री करून घ्यावी.

(वाचा : Diploma Admission : डिप्लोमा प्रवेश अर्जांना मुदतवाढ, विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत अर्ज भरता येणार )

कोट्याबाबत माहिती :

  • अल्पसंख्याक कोटा किंवा इनहाऊस कोट्यात प्रवेश संबंधित कॉलेज स्तरावर केला जाईल. पण, त्यासाठी विद्यार्थ्याने प्रवेश अर्जाच्या भाग २ मध्ये संबंधित कोट्यावर टिक केली असली पाहिजे.
  • कोणत्याही कोट्याटून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याला कॉलेज बदली करायचे असल्यास त्याला तो प्रवेश रद्द करून पुन्हा तिसऱ्या फेरीनंतर पुन्हा प्रवेश प्रक्रियेत येता येईल.
  • बायफोकल अभ्यासक्रमांसाठीविद्यार्थ्याला पहिल्यादा संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. त्यानंतरच त्या विद्यार्थ्याला ऑनलाइन प्रवेश अर्जाच्या भाग २ मध्ये बायफोकल विषयांचा पर्याय दिसेल. त्यापैकी एका पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यानंतर कॉलेजला यादी पाठवण्यात येईल आणि त्यानंतर कॉलेज गुणवत्ता व आरक्षणाचे निकष लावून गुणवत्ता यादी जाहीर करतील.

ज्या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणांमध्ये बदल झाला असेल, त्यांनी त्वरीत आपल्या शाळेत किंवा मार्गदर्शन केंद्रावर जाऊन दुरुस्ती करून घ्यावी.

(वाचा : Jobs Opening at RBI : भारतीय रिझर्व बँकेत नोकरी संधी जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आणि निकष )

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.