Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

HD अमोलेड डिस्प्लेच्या Amazfit Cheetah सीरीजच्या दोन स्मार्टवॉच लाँच, पाहा किंमत

8

अमेजफिट ने आपल्या दोन नवीन स्मार्टवॉच Amazfit Cheetah आणि Cheetah Pro ला लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टवॉचला खास करून धावपटूसाठी डिझाइन करण्यात आले आहे. Amazfit Cheetah सीरीजच्या या दोन्ही वॉच सोबत AI सपोर्टचा Zepp Coach चा सपोर्ट दिला आहे. Amazfit Cheetah सीरीजच्या या वॉच मध्ये ऑफलाइन मॅप्सचा सपोर्ट दिला आहे. यासोबत ड्युअल बँड जीपीएस अँटिना दिला आहे. यावरून ९९.५ टक्के योग्य मॅप मिळते, असा दावा करण्यात आला आहे.

Amazfit Cheetah, Cheetah Pro ची किंमत
Amazfit Cheetah ची किंमत २२९.९९ डॉलर म्हणजेच जवळपास १८ हजार ७०० रुपये आहे. याला स्पीडस्टर ग्रे कलरमध्ये खरेदी करू शकता. Amazfit Cheetah Pro ची किंमत २९९.९९ डॉलर म्हणजेच जवळपास २४ हजार ५१२ रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही वॉचची विक्री अमेझॉन, अमेझफिटच्या स्टोर आणि AliExpress वरून केली जाणार आहे. भारतीय बाजारात या दोन्ही वॉचच्या लाँचिंगवरून सध्या कोणतीही माहिती दिली गेली नाही.

वाचाः अर्ध्या किंमतीत खरेदी करा Room Heater, मिळतेय बंपर सूट

Amazfit Cheetah ची स्पेसिफिकेशन
Amazfit Cheetah मध्ये 1.39 इंचाची HD अमोलेड डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेवर टेंपर्ड ग्लास एंटी फिंगरप्रिंट कोटिंग आहे. वॉच सोबत 100 वॉच फेसेजचा सपोर्ट आहे. अलवेज ऑन डिस्प्ले सुद्धा आहे. वॉच सोबत डुअल बँड GPS दिले आहे. यावरून रियल टाइम जीपीएस ट्रॅकिंगचा दावा करण्यात आला आहे.
Amazfit Cheetah मध्ये 150 हून जास्त स्पोर्ट्स मोडचा सपोर्ट दिला आहे. ज्यात डान्स, वॉटर स्पोर्ट्स, वॉकिंग, स्विमिंग आदीचा समावेश आहे. यासोबत BioTracker PPG बायोमेट्रिक ऑप्टिकल सेन्सर, ब्लड ऑक्सिजन ट्रॅकर, हार्ट रेट ट्रॅकर, स्ट्रेस लेवल ट्रॅकिंग सारखे हेल्थ फीचर्स आहेत. Amazfit Cheetah मध्ये स्लीप आणि पीरियड ट्रॅकर सुद्धा आहे. वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा मिळते. Amazfit Cheetah मध्ये 440mAh ची बॅटरी दिली आहे. यावरून ७ दिवसाचा बॅटरी बॅकअप मिळतो, असा कंपनीने दावा केला आहे.

वाचाः हे ॲप मोबाइलमध्ये असेल तर आताच डिलीट करा, अन्यथा चोरी होईल सर्व डेटा

वाचाः HP ने आणला सर्वात स्वस्त लॅपटॉप, फीचर्सला नाव ठेवायला जागाच नाही

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.