Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Blue Dart आणि FedEx च्या नावाने लोकांच्या अकाउंटमधून पैसे गायब करताहेत स्कॅमर्स

8

देशभरात Scam च्या घटना वाढत आहेत. सोबत तपास एजन्सी याला रोखण्यासाठी वेगवेगळे पावले उचलत आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी Zerodha चे Co-Founder नितिन कामत यांनी नुकत्याच दिलेल्या एका वक्तव्यासंबंधी माहिती देत आहोत. अशा घटना रोखण्यासाठी पाऊले उचलायला हवीत. कामत यांनी सांगितले की, नवीन स्कॅम FedEx आणि Blue Dart च्या नावाने होत आहे. हे स्कॅमर्स स्वतःला सीबीआय आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याची बतावणी करतात.

नितीन कामत नयांनी ट्विटरवर सांगितले की, याची तक्रार स्वतः एका सहकाऱ्याने सुद्धा केली आहे. स्कॅमर्सने त्याच्या अकाउंट मधून पैसे गायब केले होते. स्कॅमर्सने स्वतःला पोलीस असल्याचे सांगितले. त्याने दावा केला होता की, एक पार्सल जप्त केले आहे. त्यात ड्रग्स मिळाले आहे. खरं म्हणजे पीडित व्यक्तीने एक ऑर्डर केली होती. ते पार्सल Fedex मधून येणार होते.

वाचाः HD अमोलेड डिस्प्लेच्या Amazfit Cheetah सीरीजच्या दोन स्मार्टवॉच लाँच, पाहा किंमत

त्यामुळे ती व्यक्ती घाबरली. स्कॅमरने आपली बाजू खरी दाखवण्यासाठी आधार नंबरचा हवाला दिला आहे. सोबत त्या पीडित व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून एक लेटर सुद्धा दाखवले. ज्यात पार्सल जप्त करण्यास सांगितले होते. यामुळे ती व्यक्ती घाबरली. त्यामुळे त्याने पैसे दिले. परंतु, अशावेळी न घाबरता अलर्ट राहायला हवे. स्कॅमर्सने आपली बँक डिटेलही दिली होती. तसेच पार्सल रिलीज करण्यासाठी काही पैसे मागितले.

वाचाः हे ॲप मोबाइलमध्ये असेल तर आताच डिलीट करा, अन्यथा चोरी होईल सर्व डेटा

पीडित व्यक्तीने तत्काळ बँक डिटेलमध्ये पैसे ट्रान्सफर केले. परंतु, प्रत्येकाला अलर्ट राहण्याची गरज आहे. कामत यांनी पुढे सांगितले की, कोणत्याही स्कॅम पासून सुरक्षित राहण्यासाठी अलर्ट राहायला हवे. कोणत्याही वेळी कॉल आल्यास घाईघाईने निर्णय घेऊ नये.

वाचाः डेबिट-क्रेडिट कार्डमधील चीप कसं काम करतेय?, या ठिकाणी जाणून घ्या

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.