Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सॅमसंग गॅलेक्सी s23 अल्ट्रावर १८ हजाराचा डिस्काउंट, पाहा बेस्ट डील

21

अमेझॉनकडून 5G रिवोल्यूशन सेल लाइव झाली आहे. २५ जून २०२३ पर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. या सेलमध्ये 5g इनेबल्ड डिव्हाइसेज खूप कमी किंमतीत मिळत आहे. अमेझॉनवर सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा 5g स्मार्टफोनला सर्व ऑफर्स नंतर १ लाख ६ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या ऑफर मध्ये हा टॉप लाइन स्मार्टफोन एकदम चांगली डील आहे. या फोनवर १० हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस आणि ८ हजार रुपयापर्यंत एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करून डिस्काउंट मिळवू शकता. या फोनची किंमत १८ हजार रुपये कमी होते. या फोनला १८ महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता.

Galaxy S23 Ultra बेस्ट प्रीमियम स्मार्टफोन्स पैकी एक आहे. यात 200MP सेंसर, एनहांस्ड डिझाइन आणि स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन २ प्रोसेसर दिले आहे. अमेझॉनच्या 5G रिवोल्यूशन सेल मध्ये 5g स्मार्टफोन्स मध्ये खूप चांगले ऑफर्स मिळत आहेत. यात टॉप स्मार्टफोन्स जसे, वनप्लस 11 5G, वनप्लस 11R 5G, iQOO Z7s, iQOO Neo 7 5G, iQOO 11 5G, सॅमसंग S23 अल्ट्रा 5G, सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप 4 5G आणि टेक्नो फँटम V फोल्ड 5G वर ऑफर्स मिळत आहेत. हा सेल उद्यापर्यंत म्हणजेच २५ जून २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.

वाचाः HD अमोलेड डिस्प्लेच्या Amazfit Cheetah सीरीजच्या दोन स्मार्टवॉच लाँच, पाहा किंमत

Samsung Galaxy S23 Ultra ची स्पेसिफिकेशन
सॅमसंग गॅलेक्सी एस 23 अल्ट्रा मध्ये 6.8 इंचाचा शानदार Dynamic AMOLED 2X डिस्प्ले मिळतो. जो 120Hz रिफ्रेश रेट येतो. डिस्प्ले सोबत 1750 निट्स ची पीक ब्राइटनेस, HDR10+, 240Hz ची टच सँपलिंग रेट आणि गोरिल्ला ग्लास विक्टस 2 चे प्रोटेक्शन मिळते. फोनला अँड्रॉयड 13 आधारित One UI 5.1 दिले आहे. फोन मध्ये क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 कस्टम प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. फोन मध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि १ टीबी पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट दिला आहे. Galaxy S23 Ultra मध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. पहिला लेन्स 200 मेगापिक्सल चा ISOCELL HP2 सेंसर आहे. दुसरा लेंस 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर आहे. अन्य दोन लेंस 10-10 मेगापिक्सलचे आहे. ज्यात एक टेलीफोटो लेंस आहे. कॅमेरासोबत ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि VDIS मिळेल.

वाचाः Blue Dart आणि FedEx च्या नावाने लोकांच्या अकाउंटमधून पैसे गायब करताहेत स्कॅमर्स

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.