Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत यंदा एसएससी बोर्डाव्यतिरिक्त असणाऱ्या केंद्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यानी यंदा अकरावीच्या पहिल्या यादीत बाजी मारली आहे.
( वाचा : FE 2023 Admission : प्रथम वर्षीय इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. )
गेल्या वर्षी एसएससी बोर्डाच्या सुमारे १ लाख २७ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला होता. मात्र, यंदा १ लाख २२ हजार ४४७ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे.
दरम्यान, मुंबईतील नामांकित कॉलेजांमधील प्रवेशसाठी यंदाही चुरस कायम असल्यामुळे याही वर्षी नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी यंदाही मोठी स्पर्धा असल्याचे स्पष्ट होते.
अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या २ लाख १५ हजार अर्जांपैकी १ लाख ३६ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीनुसार प्रवेशसाठी जागावाटप करण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्याच गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीक्रामाचे कॉलेज मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही घट झाली आहे.
( वाचा : FYJC Admission : अकरावी प्रवेशाचे बिगुल! प्रकियेबाबत असेल संभ्रम तर पालकांनी हे वाचाच )
यंदा दहावीच्या निकालात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३.११ टक्यांनी घट झाली आहे. पण, कॉलेज्जांमध्ये प्रवेशाची चुरस कमी होण्याऐवजी वाढली आहे.
यंदा निकाल घटला असला तरी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई विभागात यंदा ११ हजार ७८५ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यात, अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची भर पडल्याने कट ऑफमध्ये वाढ झाली आहे.
पहिल्या गुणवत्ता यादीनुसार :
- कला शाखेसाठी एकूण ३२ हजार ७२३ जागांपैकी १३ हजार ७०६ जागांचे वितरण करण्यात आले आहे.
- वाणिज्य शाखेतील एकूण १ लाख २३ हजार ६०८ जागांपैकी ७२ हजार ४४७ जागा वितरीत
- ७६ हजार ९५१ जागांपैकी ४९ हजार ४९५ जागांचे विज्ञान शाखांतर्गत जागावाटप
- तर, एकूण ३ हजार ३०९ जागांपैकी ५८१ जागांचे एचएसव्हीसी शाखेसाठी जागा वितरण
(वाचा : Diploma Admission : डिप्लोमा प्रवेश अर्जांना मुदतवाढ, विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत अर्ज भरता येणार )
पहिल्या यादीत प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ :
विद्यार्थी, पालक व काही कनिष्ठ महाविद्यालयांच्या मागणीनुसार तसेच फेरीची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पुर्ण होण्याकरीता, अकरावी प्रवेश प्रक्रियेतील नियमित फेरी १ अंतर्गत प्रवेश घेण्याची वेळ सोमवार दिनांक २६ जून २०२३ सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे २४ जूनपर्यत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून कॉलेज निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांना, आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी आज ६ वाजेपर्यत वेळ मिळणार आहे.