Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बेनेट विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा, दोन महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मान

9

नवी दिल्ली : टाइम्स ग्रुप एंटरप्राइझेसच्या ‘बेनेट युनिव्हर्सिटी (बेनेट विद्यापीठा)’ने दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर आपले नाव कोरत शैक्षणिक क्षेत्रातील आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. ‘बीडब्ल्यू लीगल वर्ल्ड’ (BW Legal World) यांच्या तर्फे विद्यापीठाला ‘विधि व कायदेविषयक शिक्षण देणारे भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ’ म्हणून गौरवण्यात आले आहे. तर, ‘झी डिजिटल’ (Zee Digital) यांच्यावतीने ‘एड्युफ्युचर एक्सलन्स अवॉर्ड्स सीझन ३ (Edufuture Excellence Awards Season 3’ मध्ये ‘बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन इंजिनीअरिंग कॉलेज (Best Infrastructure In Engineering College)’ या महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.( वाचा : Maharashtra Talathi Bharti 2023 : महसूल व वन विभाग तलाठी पदभरती ; ४३४४ पदांसाठी महाभरती )

नवी दिल्लीतील, द लीलामद्ये नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यात या मत्त्वपूर्ण पुरसकारांचे वितरण करण्यात आले. देशाचे केंद्रीय मंत्री श्री. महेंद्र नाथ पांडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

BW Legal World द्वारे बेनेट युनिव्हर्सिटीची भारतातील सर्वोच्च कायदा विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली असून, सर्वोत्कृष्ट विधि आणि कायदेशीर शिक्षण देणाऱ्या विद्यापीठ म्हणून गौरव केला आहे.

( वाचा : Indian Army : सैन्यदलाद्वारे तांत्रिक आणि विधी विभागासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात )

शिवाय, झी डिजिटलद्वारे ‘एड्युफ्युचर एक्सलन्स अवॉर्ड सीझन ३’ मध्ये बेनेट युनिव्हर्सिटीला प्रदान करण्यात आलेला ‘बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन इंजिनीअरिंग कॉलेज’ हा पुरस्कार संस्थेच्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे. आधुनिक पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर विद्यापीठाचा भर विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्यास सक्षम करतो आणि त्यांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यास तयार करतो ही एक कौतुकाची बाब आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील नवकल्पना आणि संशोधनात आघाडीवर राहण्याच्या दृष्टीकोनातून, बेनेट विद्यापीठाने विविध विषयांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती करणे सुरू ठेवले आहे. भारतातील महत्त्वाच्या विद्यापीठांच्या यादीत आता विद्यापीठाला बेनेट विद्यापीठालाही महत्त्वाचे आणि सर्वोच्च स्थान मिळाले आहे.

( वाचा : FE 2023 Admission : प्रथम वर्षीय इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. )

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.