Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Amazfit Pop 3R : तब्बल १२ दिवसांच्या चार्जसह येणारी स्मार्टवॉच भारतात लाँच, २९ जूनपासून विक्रीला सुरुवात

8

नवी दिल्ली : Smartwatch with 12 Days Charge : स्मार्टवॉच कंपनी Amazfit ने आपली नवीकोरी Amazfit Pop 3R ही वॉच भारतात लाँच केली आहे. राउंड शेपमध्ये असणाऱ्या या वॉचचा डिस्प्ले १.४३ इंच मोठा असून AMOLED डिस्प्ले आहे. ही वॉच iOS, Android अशा दोन्ही डिव्हाईसला सपोर्ट करते. विशेष म्हणजे या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगचं फीचरही देण्यात आलं आहे. ही वॉच ब्लूटूथ ५.२ कनेक्टीव्हीटीसह येतो. कंपनीच्या मते ही वॉच संपूर्ण चार्जमध्ये तब्बल १२ दिवस चालू शकते. तर या वॉचचे इतर फीचर्स आणि किंमत जाणून घेऊ…

Amazfit Pop 3R चे फीचर्स
तर वर सांगितल्याप्रमाणे याची डायल गोल असून १.४३ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे या वॉचमध्ये १०० हून अधिक स्पोर्ट्स मोड असून कितीतरी वॉचफेसेस देखील आहेत. यात कॉलिंगसाठी एक इनबिल्ट मायक्रोफोन, स्पीकर देखील दिला गेला आहे. हेल्थ आणि फीटनेस ट्रॅक करण्यासाठी या वॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटर, SpO2 लेव्हल मॉनिटर आणि एक स्ट्रेस मॉनिटरही आहे.

एका चार्जमध्ये १२ दिवस चालणार

कंपनीने दावा केला आहे की, ही वॉच एका नॉर्मल चार्जमध्ये तब्बल १२ दिवसांच्या बॅटरी लाईफसह येते. विशेष म्हणजे या चार्जला ९० मिनिटंच लागतात चार्ज होण्यासाठी, असंही कंपनीनं सांगितलं आहे. IP68 रेटिंगसह ही वॉच येते. वॉचचं वजन ५५.४८ ग्राम आहे.
वाचा : OnePlus चा ५६,९९९ रुपयांचा OnePlus 11 5G २५ हजारांहून स्वस्तात घेण्याची संधी, Amazon ची खास ऑफर

किंमतीचं काय?
तर या Amazfit Pop 3R ची किंमत भारतात ३,४९९ रुपये असणार आहे.तसंच २९ जूनपासून ही वॉच फ्लिपकार्ट या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ब्लॅक, ब्लॅक प्रिमीयम आणि ब्लॅक मेटालिक अशा तीन स्ट्रॅपवॉच कलरमध्ये ही वॉच येणार आहे.

वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.