Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus चा ५६,९९९ रुपयांचा OnePlus 11 5G २५ हजारांहून स्वस्तात घेण्याची संधी, Amazon ची खास ऑफर

9

नवी दिल्ली : OnePlus 11 5G Offer : आघाडीची ई-कॉमर्स साईट Amazon वर सध्या कोणताही सेल सुरू नसला तरी, एका दमदार फोनवर दमदार असं बंपर डिस्काउंट दिलं जात आहे. तुम्ही OnePlus 11 5G मोठ्या सवलतीसह सध्या घरी आणू शकता. या फोनसोबत ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. यासोबतच खास बँक कार्ड्स वापरल्यास डिस्काउंटही मिळणार आहे. चला तर जाणून घेऊ OnePlus 11 5G ची नेमकी किंमत किती?तर OnePlus 11 5G च्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ५६,९९९ रुपये आहे. Amazon वर याला ५ पैकी ४.३ रेट दिले गेले आहे. त्यामुळे एकदम ही रक्कम भरु शकत नसाल तर तुम्ही EMI वर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा २,७२३ रुपये द्यावे लागतील. यासोबतच काही बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. OneCard क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास २ हजार रुपयांची झटपट सूट दिली जाईल. त्याच वेळी, HSBC कॅशबॅक कार्डने पेमेंट केल्यास ५ टक्के त्वरित सूट दिली जाईल. याशिवाय सर्वात खास म्हणजे तब्बल ३२,८०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जाईल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर, फोनची किंमत २४,१९९ रुपये राहते. दरम्यान इतकी मोठी एक्सचेंज मिळवण्याकरता जुन्या फोनचं मॉडेल आणि कंडीशन चांगली असायला हवी.

OnePlus 11 5G चे फीचर्स

या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर ५० मेगापिक्सेलचा आहे. दुसरा ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि तिसरा ३२ मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर देखील आहे. फोनमध्ये ६.७ इंचाचा AMOLED QHD डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर 120 Hz आहे. हा फोन Android 13 वर आधारित OxygenOS वर काम करतो. हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 16 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे जी 100W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येते

वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.