Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या दिवशी होऊ शकतो लाँचिंग
रिपोर्टच्या माहितीनुसार, फोनला या वर्षी दिवाळी आधी लाँच केले जाऊ शकते. परंतु, कंपनीने अधिकृत लाँचिंगच्या तारखेची घोषणा केली नाही. परंतु, अपेक्षा अशी आहे की, जिओ फोन ५जी ला यावर्षी गणेश चतुर्थीचे औचित्य साधून लाँच करू शकते. तर काही रिपोर्ट्समध्ये हा दावा केला की, या फोनला यावर्षाच्या दिवाळीत किंवा नवीन वर्षात लाँच केले जाऊ शकते.
वाचाः नव्या रंगात येताच Motorola Edge 40 चा धुमाकूळ, पाहा डिटेल्स
JioPhone 5G ची संभावित किंमत
जिओ फोन 5G स्मार्टफोनला भारतात १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केले जाऊ शकते. जिओ फोन 4G ची लाँचिंग किंमत ६ हजार ४९९ रुपये होती.
वाचाः Redmi 11 Prime वर सुरू आहे बंपर डिस्काउंट, आजच ऑर्डर करा ऑनलाइन
संभावित स्पेसिफिकेशन्स
जिओ फोन ५जील डार्क ब्लू व्हेरियंट मध्ये लाँच केले जाऊ शकते. जो कंपनीचा थीम कलर आहे. फोनला पिल शेप रियर कॅमेरा मॉड्यूलमध्ये आणले जाऊ शकते. फोनमध्ये कोणत्या चिपसेटचा वापर केला जाणार आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. सध्या यासंबंधी कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, लीक रिपोर्ट्मध्ये दावा केला आहे की, जिओ फोन 5G मध्ये Unisoc 5G किंवा एक डायमेंसिटी ७०० चिपसेट सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनच्या रियर मध्ये 13MP AI कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. सोबत 2MP मायक्रो कॅमेरा सोबत एलईडी सपोर्ट दिला जाऊ शकतो. फ्रंटमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये अँड्रॉयड बेस्ड Pragati OS दिला जावू शकतो.
वाचाः विजेचे बिल होईल थेट अर्धे, फक्त या सोप्या ट्रिक्स वापरा