Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Google Pixel 7 वर बंपर सूट, ‘या’ साइटवरून करा ऑर्डर

9

नवी दिल्ली : Google Pixel 7 लाँच होऊन काही महिने झाले आहेत. अनेकांनी हा स्मार्टफोन खरेदी केला आहे. दरम्यान याचं फीडबॅकही चांगलं आलं असून जर तुम्हीही हा फोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. यासोबतच आम्ही तुम्हाला नवीन डिस्काउंट ऑफरबद्दलही सांगणार आहोत. तर या फोनवर दमदार डिस्काउंट मिळत असून Flipkart वरून Google Pixel 7 (128GB+8GB RAM) तुम्ही ऑफरमध्ये ऑर्डर करू शकता.
या स्मार्टफोनची मूळ किंमत ५९,९९९ रुपये आहे आणि तुम्ही १०% डिस्काउंटनंतर ५३,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळणार आहेत. HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारावर तर थेट ४ हजार रुपयांची सूट मिळू शकते. तसंच तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारावर १०% सूट मिळू शकते. तसंच, तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये वेगळी सूट मिळू शकते. तुम्ही फ्लिपकार्टला जुना स्मार्टफोन परत केल्यास, तब्बल ३८ हजारांपर्यंत सूट मिळू शकते.

वाचा : Smartphone Tips : पावसाळ्यात स्मार्टफोनचा स्पीकर बिघडला? घरच्या घरी करु शकता रिपेअर, फॉलो करा सोप्या टिप्स

Google Pixel 7 चे खास फीचर्स
या फोनच्याप्रमुख वैशिष्ट्यांमध्ये कॅमेरा एक बेस्ट फीचर आहे. या फोनमध्ये १२.२ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे, जो एकदम भारी फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यास मदत करतो. फोनमध्ये Google च्या विशेष फोटोग्राफी फीचर्ससह इतर अनेक फीचर्सही आहेत. ज्यामध्ये नाईट साइट, पोर्ट्रेट मोड आणि नेटिव्ह Google लेन्स. यांचा समावेश होतो. Google Pixel 7 मध्ये वायरलेस चार्जिंग, लेटेस्ट बॅटरी तंत्रज्ञान आणि Android 12 ऑपरेटिंग सिस्टम यांसारख्या शक्तिशाली वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय, फोनमध्ये एक्सेलरेटेड नेटवर्किंग, स्मार्ट कॉलिंग आणि ड्युअल सिम सपोर्टसह Google असिस्टंट यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.