Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘आदिपुरुष’पेक्षा वरचढ ठरले मराठी चित्रपट! ‘रावरंभा’, ‘चौक’ आणि ‘TDM’ने मारली बाजी; वाचा कमाई

12

मुंबई: सध्या सगळीकडे ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ ची चर्चा आहे. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी चित्रपटाला नापसंती दर्शवली. पहिल्या दोन दिवसातच ‘आदिपुरुष’ची जादू प्रेक्षकांवरून उतरली आणि नेटकऱ्यांनी चित्रपटावर जोरदार हल्लाबोल केला. चित्रपटाच्या आणि त्यातील कलाकारांच्या क्रेझमुळे पहिल्या दोन दिवसात चित्रपटाने प्रचंड कमाई केली मात्र त्यानंतर प्रेक्षकांनी त्याला जमिनीवर आदळला. सुरुवातीच्या काही दिवसात आगाऊ बुकिंगचा फायदाही सिनेमाला झाला. मात्र नंतर परिस्थिती बदलली. काही ठिकाणी तर आदिपुरुषचे शो रद्द करावे लागले आहेत. या सगळ्यात मराठी चित्रपट अजूनही तग धरून आहे असंच म्हणावं लागेल. आदिपुरुषसारखा मोठा चित्रपट समोर असताना मराठी चित्रपट अजूनही कमाई करताना दिसत आहेत. वाचा किती केली आहे कमाई.

प्रथमेश- मुग्धाच्या लग्नाची तारीख ठरली; पार पडलं नवरदेवाचं पहिलं केळवण, घेतला झक्कास उखाणा
‘आदिपुरुष’ चित्रपटाने पहिल्या १२ दिवसात तब्बल २७८ कोटींचा गल्ला जमवला. यापैकी सर्वाधिक कमाई केवळ पहिल्या २ दिवसांची आहे. मात्र त्यानंतर आदिपुरुषच्या कमाईचा वेग मंदावला आणि चित्रपट फ्लॉपच्या यादीत येऊन बसला. दुसरीकडे मराठी चित्रपटांनी आपली घौडदौड सुरूच ठेवली.

रावरंभा

‘रावरंभा’ या चित्रपटाने तीन आठवड्यात तब्बल ६ कोटी २५ लाखांचा गल्ला जमावला आहे. हा चित्रपट मोठया चित्रपटगृहांमधून उतरला असला तरी तो टुरिंग टॉल्किजवार सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Ravrambha

रिंकू राजगुरू नेमकी गेली कुठे, आर्चीने साऊथकडे वळवला मोर्चा?
चौक

दुसरीकडे ‘चौक’ या राजकारणावर आधारलेल्या चित्रपटाने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाने प्रेक्षकांना चौकातील परिस्थिती दाखवली. या चित्रपटाने नुकताच चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ४ कोटी ५५ लाखांची कमाई केली आहे.

Chowk Marathi Movie

टीडीएम

तर भाऊराव कऱ्हाडे यांच्या ‘टीडीएम’ बद्दल सांगायचं तर या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अजूनही अनेक ठिकाणी ‘टीडीएम’ आपली जादू चालवतोय. या चित्रपटाने खासकरून ग्रामीण भागातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाने एकूण ३ कोटींहुन जास्तीची कमाई केली असल्याचं एका वेबसाइटने म्हटलं आहे.

TDM Marathi Movie

यावरून ‘आदिपुरुष’ कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असली तरी मराठी चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली असल्याचं चित्र आहे. आता ‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होत आहे.

TDM चित्रपटाच्या रॅलीत खासदार सुजय विखेंचा सहभाग; ट्रॅक्टरमध्ये बसत कलाकारासोबत गप्पा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.